शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता जारी, करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले 2000 रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 15:34 IST

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)  यांनी आज पीएम किसान सन्मान निधीच्या (PM Kisan Samman Nidhi) पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयांचा 15 वा हप्ता जारी केला. बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान आज झारखंडमध्ये आहेत. यादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना ही भेट दिली आहे. थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता पाठविला गेला आहे. यावेळी 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान योजनेचा हप्ता पाठवला जाईल.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला. या अंतर्गत 17000 कोटी रुपये जारी करण्यात आले. त्याआधी 13 व्या हप्त्यासाठी 16800 कोटी रुपये जारी करण्यात आले होते. यावेळी जवळपास 18000 कोटी रुपये जाहीर होण्याची शक्यता आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 2.62 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत.

केवायसी करणे अनिवार्य पीएम किसान सन्मान निधी प्राप्त करणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी सरकारने ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे. 15 वा हप्ता देखील फक्त ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळेल. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसीचे काम केले नाही, त्यांना पैसे मिळणार नाहीत.

11 व्या हप्त्यानंतर लाभार्थींच्या संख्येत घटपीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 11व्या हप्त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. सरकारने केलेल्या कडक नियमांमुळे घट झाली आहे. याआधी लोक फसव्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेत होते. 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 11 वा हप्ता मिळाला आहे. यानंतर 12 व्या हप्त्याचे लाभार्थी सुमारे 2 कोटींनी कमी होऊन 8 कोटी झाले. यानंतर, 13व्या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या 8.2 कोटी झाली, तर 8.5 कोटी शेतकऱ्यांना 14वा हप्ता मिळाला.

योजनेचे लाभार्थी असाल तर असे करा तुमचे नाव चेकपीएम किसान योजनेसाठी शेतकरी ऑनलाईन अर्ज (नोंदणी) करू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी किंवा त्यामध्ये काही बदल करण्यासाठी पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवरून करता येणार आहे. यासाठी प्रथम www.pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइटच्या होम पेजवर, फार्मर्स कॉर्नर उजव्या बाजूला मोठ्या अक्षरे लिहिलेले आहे. आपले नाव सूचीमध्ये आहे की नाही हे आपण पाहू इच्छित असल्यास आपल्याला लाभार्थी यादी/ Beneficiary list वर क्लिक करावे लागेल. यानंतर आपण आपले नाव राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गाव यांचे नाव भरून तपासू शकता.

काय आहे पीएम किसान योजना?दरम्यान, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojna) दरवर्षी 6,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातात, जे प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. याअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत 11 हप्ते पाठवण्यात आले आहेत. जर अद्याप तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले गेले नाहीत, तर सर्वात आधी तुमचे स्टेटस आणि बँक खाते चेक करा. 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी