शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आज त्यांना देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बाळासाहेबांना आजरांजली वाहिली आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेबांच्या दृष्टिकोनातून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू, असे नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहताना म्हटले आहे.
समाजमाध्यमांवरून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहताना नरेंद्र मोदी म्हणाले की, महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर खोलवर प्रभाव टाकणारे दिवंगत मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, या दिग्गज व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण आदरांजली. तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब जनतेशी एक अद्वितीय नाते जपून होते. राजकारणाबरोबरच त्यांना संस्कृती, साहित्य आणि पत्रकारितेचीही विशेष आवड होती. व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत समाजाचे सूक्ष्म निरीक्षण आणि विविध विषयांवरील निर्भय भाष्य दिसून येते. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहताना त्यांच्यासोबतचे दोन जुने फोटोही शेअर केले आहेत. तसेच त्यामाध्यमातून पंतप्रधान मोदींनी त्यांच्यासोबतच्या दृढ संबंधांना उजाळा दिला आहे.
Web Summary : PM Modi honored Balasaheb Thackeray on his birth centenary, citing his profound impact on Maharashtra's socio-political landscape and his inspirational vision for the state's progress. Modi also shared old photos, recalling their strong bond.
Web Summary : पीएम मोदी ने बालासाहेब ठाकरे को उनकी जन्म शताब्दी पर श्रद्धांजलि अर्पित की, महाराष्ट्र के सामाजिक-राजनीतिक परिदृश्य पर उनके गहरे प्रभाव और राज्य की प्रगति के लिए उनकी प्रेरणादायक दृष्टि का उल्लेख किया। मोदी ने पुरानी तस्वीरें भी साझा कीं, उनके मजबूत बंधन को याद किया।