‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल सशस्त्र दलाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला गौरव; कोलकात्यात संयुक्त कमांडर संमेलनाचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 08:02 IST2025-09-16T08:01:55+5:302025-09-16T08:02:36+5:30

ऑपरेशन सिंदूरनंतर सशस्त्र दलाचे हे पहिलेच संयुक्त संमेलन आहे. सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेपलिकडे पाकिस्तानी हद्दीत असलेल्या दहशतवाद्यांचे  तळ उद्ध्वस्त केले.

Prime Minister Narendra Modi lauds Armed Forces for 'Operation Sindoor'; Inaugurates Joint Commanders' Conference in Kolkata | ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल सशस्त्र दलाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला गौरव; कोलकात्यात संयुक्त कमांडर संमेलनाचे उद्घाटन

‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल सशस्त्र दलाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला गौरव; कोलकात्यात संयुक्त कमांडर संमेलनाचे उद्घाटन

कोलकाता : ऑपरेशन सिंदूरमध्ये मोलाची भूमिका बजावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भारतीय सशस्त्र दलाचा गौरव केला. येथे विजय दुर्गस्थिती भारतीय लष्कराच्या पूर्व विभागीय मुख्यालयात संयुक्त कमांडर संमेलनाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी ‘भारतीय सशस्त्र दल-व्हिजन २०१७’चे प्रकाशनही त्यांनी केले.

ऑपरेशन सिंदूरनंतर सशस्त्र दलाचे हे पहिलेच संयुक्त संमेलन आहे. सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेपलिकडे पाकिस्तानी हद्दीत असलेल्या दहशतवाद्यांचे  तळ उद्ध्वस्त केले. या मोहिमेतील अचूकता, व्यावसायिकता, लक्ष्यपूर्ती पाहता ही तिन्ही लष्करी दलाच्या समन्वयाचा परिणाम असल्याचे लष्करी अधिकाऱ्याने नमूद केले. संरक्षणमंत्री राजनाथसिंह या संमेलनात सहभागी झाले. याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, लष्करप्रमुख जनरल अनिल चौहान सहभागी होते.

बिहारची विडीशी तुलना हा या राज्याचा अपमान

पुर्णिया : काँग्रेसने बिहारच्या जनतेची तुलना विडीसोबत केली. हा या राज्यातील जनतेचा अपमान आहे, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी येथे एका सभेत केली.

आगामी निवडणुकीत जनता इंडिया आघाडीला योग्य  धडा शिकवेल, असे त्यांनी सांगितले.  तंबाखूजन्य वस्तूंवरील जीएसटीवर टीका करण्यासाठी केरळ प्रदेश काँग्रेसने  केलेली एक पोस्ट वादग्रस्त ठरली होती.

बिहारचा वेगाने विकास ‘इंडिया’ला सहन होत नाही

मोदी म्हणाले की, काँग्रेसचे नेते म्हणतात की बिडी आणि बिहार हे दोन्ही शब्द ‘बी’ या इंग्रजी अक्षराने सुरू होतात. हा जनतेचा अपमान आहे.

काँग्रेस व विरोधी पक्ष बिहारमध्ये ठाण मांडून बसलेल्या घुसखोरांची पाठराखण करत आहेत, पण या घुसखोरांची एनडीए सरकार हकालपट्टी करणार असल्याचेही नरेंद्र मोदी म्हणाले.

Web Title: Prime Minister Narendra Modi lauds Armed Forces for 'Operation Sindoor'; Inaugurates Joint Commanders' Conference in Kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.