शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांची शिस्त आणि प्रदूषणाविषयीची चिंता; कॅबिनेट मंत्र्यांच्या गाडीतूनच येतात राज्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 09:14 IST

कॅबिनेट मंत्र्यांच्या गाडीतूनच येतात राज्यमंत्री

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात आहे. दिवाळीच्या दिवशी येथील वायु गुणवत्ता निर्देशांक १००० वर गेला होता. अजुनही येथील प्रदूषण धोकादायक पातळीत आहे. केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या स्तरावर प्रयत्न करीत असतातच. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहनांची अनावश्यक एनर्जी वाचविण्याचा व प्रदूषण टाळण्यासाठी अभिनव प्रयोग सुरू केला आहे. 

दर पंधरा दिवसाला पंतप्रधान मंत्री परिषदेची बैठक घेत असतात. येथील सुषमा स्वराज मेमोरियल हॉलमध्ये ही बैठक पार पडते. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात ३० कॅबिनेट, २ स्वतंत्र प्रभार असलेले, तर ४५ राज्यमंत्री आहेत. या बैठकीला आता कॅबिनेट मंत्र्यांच्या वाहनातून दोन राज्यमंत्री येतात. यामुळे वाहनांचा ताफा एकतृतीयांश कमी होतो.

मंत्र्यांच्या मागेपुढे असणाऱ्या सुरक्षा वाहनांनाही फाटा देण्यात आला आहे. प्रदूषण आणि अनावश्यक वाहने पाहता मोदींनी ‘कार पूल’ करण्याचा हा अभिनव प्रयोग सुरू केला आहे. प्रत्येक मंत्र्याने त्यांच्या विभागात फेरफटका मारून अधिकारी ते कारकुनापर्यंत सगळ्यांशी चर्चा करावी, त्यांच्या संपर्कात असावे आणि मंत्र्यांच्या टेबलावर कोणतीही फाइल चार दिवसांपेक्षा अधिक काळ पडून राहू नये, अशा सूचना पंतप्रधान मोदी यांनी दिल्या आहेत.

  • कोणत्या कॅबिनेट मंत्र्यांसह तुम्ही बैठकीला यायचे आहे याची सूचना राज्यमंत्र्यांना पंतप्रधान कार्यालयातून देण्यात येते. या प्रवासातून कॅबिनेट व राज्यमंत्र्यामध्ये सौहार्द, संवाद वाढविणे हाही उद्देश आहे. 
  • विशेष म्हणजे या बैठकीत पंतप्रधान सगळ्यात मागे बसतात. ज्या मंत्र्यांचे नाव घेतले गेले की, त्याने आपल्या विभागाने काय केले, याबाबतचा आढावा सादर करायचा असतो. 
  • यात केवळ २० मंत्र्यांचा नंबर लागतो. परंतु कोणत्या मंत्र्यांचे नाव पुकारले जाईल हे त्या वेळेपर्यंत त्या मंत्र्यालाही माहीत नसते. त्यामुळे सगळेच संपूर्ण तयारीनिशी जातात. 
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीenvironmentपर्यावरणIndiaभारत