शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 10:42 IST

PM Modi On 1975 Emergency: भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती.

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती. इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या या निर्णयाला आज ५० वर्ष पूर्ण झाले. याच पार्श्वभूमीवर आणीबाणीच्या दिवसांची आठवण करून देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.  इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक असलेल्या आणीबाणीला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली, हा तोच काळ आहे, जेव्हा काँग्रेसने लोकशाहीला ओलीस ठेवले, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

"कोणाताही भारतीय आणीबाणीचा काळ विसरू शकत नाही. त्यावेळी संसदेचा आवाज दाबण्यात आला आणि न्यायालयांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ४२ वी घटनादुरुस्ती ही त्यांच्या कृतींचे एक उत्तम उदाहरण आहे", असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

"आणीबाणीविरुद्धच्या लढाईत ठाम राहिलेल्या प्रत्येकाला आम्ही सलाम करतो. त्यावेळी वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांनी एकत्र येऊन एकमेकांसोबत काम केले. भारताच्या लोकशाही रचनेचे रक्षण करणे, हे त्यांचे ध्येय होते. त्यांच्या सामूहिक संघर्षामुळेच तत्कालीन काँग्रेस सरकारला लोकशाही पुनर्संचयित करावी लागली आणि निवडणुका घ्याव्या लागल्या, ज्यात त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावा लागले", असेही मोदी म्हणाले.

पुढे मोदी म्हणाले की, "जेव्हा आणीबाणी लागू करण्यात आली तेव्हा मी संघाचा एक तरुण प्रचारक होतो. आणीबाणीविरोधी चळवळीदरम्यान राजकीय क्षेत्रातील सर्व लोकांकडून मला खूप काही शिकायला मिळाले. ब्लूक्राफ्ट डिजिटल फाउंडेशनने त्यातील काही अनुभव पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडला आहे, याचा मला आनंद आहे. या पुस्तकाची प्रस्तावना एचडी देवेगौडा यांनी लिहिली आहे, जे स्वत: आणीबाणीविरोधी चळवळीचा चेहरा होते."

"आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसांची आठवण असलेल्या किंवा ज्यांच्या कुटुंबांनी त्या काळात त्रास सहन केला आहे, अशा सर्वांना मी सोशल मीडियावर त्यांचे अनुभव शेअर करण्याचे आवाहन करतो. यामुळे १९७५ ते १९७७ या लज्जास्पद काळाबद्दल तरुणांमध्ये जागरूकता निर्माण होईल", असे मोदींनी म्हटले आहे. तसेच आपल्या संविधानात नमूद केलेल्या तत्त्वांना बळकटी देण्यासाठी आणि विकसित भारताचे आपले स्वप्न साकार करण्यासाठी आपण एकत्र काम करत आहोत. आपण प्रगतीच्या नवीन उंची गाठू आणि गरीब आणि वंचितांची स्वप्ने पूर्ण करू, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndira Gandhiइंदिरा गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा