शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या इतिहासात दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या; ७५,२८६ कोटींची तरतूद; वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप
2
आमदारांच्या फुटीवरून रंगले दावे अन् प्रतिदावे; मुख्यमंत्री म्हणाले, ते २२ आमदार आमचेच
3
भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!
4
आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक
5
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
7
'वंदे मातरम्'चे काँग्रेसने तुकडे केले, तुष्टीकरणाचे राजकारण सुरूच : मोदी
8
इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल
9
गोव्यात कसिनोंवरील नाइट ‘जीवघेणा जुगार’; आग लागल्यास माराव्या लागतील मांडवी नदीत उड्या
10
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
11
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
12
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
13
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
14
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
15
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
16
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
17
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
18
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
19
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
20
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 21:24 IST

हे सत्तेचे भुकेले लोक पूर्वी चौकीदाराला चोर म्हणत होते, पण आता चौकीदार प्रामाणिक झाला आहे...

काही राजकीय पक्षांना वाटत होते की, सत्ता हा त्यांचा ‘जन्मसिद्ध हक्क’ आहे. या पक्षांना सत्तेपासून दूर ठेवल्यानंतर, त्यांचा रोष देशातील जनतेवर उतरू लागला. हे सत्तेचे भुकेले लोक पूर्वी चौकीदाराला चोर म्हणत होते, पण आता चौकीदार प्रामाणिक झाला आहे. 2024 च्या निवडणुकीत त्यांना या चौकीदाराबद्दल अपशब्द वापरण्याची संधी मिळाली नाही, अशा शब्दांत आज (29 नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर थेट निशाणा साधला. ते ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते.

काय म्हणाले मोदी? -पंतप्रधान मोदी म्हणाले, "काही राजकीय पक्षांना वाटत होते की, सत्ता हा त्यांचा ‘जन्मसिद्ध हक्क’ आहे. या पक्षांना सत्तेपासून दूर ठेवल्यानंतर, त्यांचा रोष देशातील जनतेवर उतरू लागला. ते आता देशाविरुद्ध कटकारस्थान रचत आहेत. जनतेची दिशाभूल करणाऱ्या अशा लोकांपासून सावध राहावे लागेल. हे सत्तेचे भुकेले लोक पूर्वी चौकीदाराला चोर म्हणत होते. पण आता चौकीदार प्रामाणिक झाला आहे. 2024 च्या निवडणुकीत त्यांना या चौकीदाराबद्दल अपशब्द वापरण्याची संधी मिळाली नाही."

हरियाणा, महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये भाजपच्या वाढत्या शक्तीसंदर्भात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "राजकीय तज्ज्ञांनी ओडिशामध्ये भाजपला फेटाळले होते. मात्र, निवडणुकीच्या निकालांनी त्यांचे अंदाज चुकीचे ठरवले. ओडिशातील जनतेने स्वतःला 'तीस मार खाँ' समजणाऱ्या लोकांनाही चोख प्रत्युत्तर दिले. भाजपला केवळ ओडिशातच नव्हे तर हरियाणा आणि महाराष्ट्रातही मोठे समर्थन मिळाले आहे." एवढेच नाही तर, यावेळी मोदींनी ओडिशातील उत्सवाच्या अनुभवांचे वर्णन करताना, ओडियाची संस्कृती आणि वारशाचेही कौतुक केले.

...ही मोदींची गॅरंटी -यावेळी, आपले सरकार जे बोलले ते पूर्ण करते, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी जनतेला दिला. ते म्हणाले, "...म्हणूनच मी म्हणतो, मोदींची गॅरंटी म्हणजे प्रत्येक गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी. आमचे सरकार प्रत्येक गॅरंटी पूर्ण करण्याची गॅरंटी देते." 

टॅग्स :OdishaओदिशाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस