शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

आचारसंहितेपूर्वी उद्घाटने, पायाभरणींचा धडाका लावा, पंतप्रधान मोदींचे मंत्र्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 6:36 AM

आपल्या नव्या प्रकल्पांचे पायाभरणी समारंभ ८ मार्चपर्यंत पूर्ण करावेत आणि जे प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत,

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : आपल्या नव्या प्रकल्पांचे पायाभरणी समारंभ ८ मार्चपर्यंत पूर्ण करावेत आणि जे प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, त्यांची उद्घाटनेही ८ मार्चच्या आधी करून टाकावीत, असे आदेश पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) सर्व मंत्रालयांना दिले आहेत. लोकसभा निवडणुकांची घोषणा ९ मार्च रोजी होण्याची शक्यता असल्याने हे आदेश देण्यात आले आहेत.स्वत: पंतप्रधान मोदी ८ मार्चपर्यंत देशातील विविध केंद्रीय प्रकल्पांची उद्घाटने व पायाभरणी समारंभ करण्यात गुंतलेले असतील. त्या निमित्ताने ते सरकारी व्यासपीठावरून विरोधकांवर राजकीय टीकाही करीत आहेत. आचारसंहितेनंतर सरकारी व्यासपीठाचा अशा कारणासाठी त्यांना वापर करता येणार नाही.रस्ते वाहतूक, रेल्वे, कोळसा, ऊ र्जा, दूरसंचार, माहिती-तंत्रज्ञान, पेट्रोलियम, विज्ञान व तंत्रज्ञान, पोलाद, खाण उद्योग, वस्त्रोद्योग, अन्नप्रक्रिया, आरोग्य, तसेच संरक्षण विभागाशी संबंधित प्रकल्पांवर मोदी सरकारने भर दिला होता. त्याचा फायदा निवडणुकांत मिळावा, यासाठीच हे आदेश देण्यात आले आहेत. नितीन गडकरी, पीयूष गोयल, आर. के. सिंह यांचे प्रकल्प प्रामुख्याने पायाभूत सुविधांशी संबंधित असल्याने त्यांवर भर देण्यात आला आहे.पंतप्रधानांच्या ज्या प्रकल्प निरीक्षण गटातर्फे पायाभूत सुविधांशी संबंधित सर्वच प्रलंबित प्रकल्पांवर लक्ष ठेवले जात होते, त्या गटाने १0. ६७ लाख कोटी रुपयांच्या ३,१00 प्रकल्पांचे मार्ग मोकळे केले. हा गट २0१५ मध्ये स्थापन करण्यात आला होता. त्यांची माहिती लोकांना द्या आणि २0१४ साली दिलेल्या आश्वासनांतील किती प्रकल्प पूर्ण केले, तेही सांगा, असे मंत्र्यांना सांगण्यात आले आहे.मनुष्यबळ विकास, वाणिज्य, सामाजिक न्याय, महिला व बालकल्याण, पर्यावरण आदी मंत्रालयांनीही आपल्या कामांचे अहवाल लोकांपर्यंत जाऊ द्या, असे पीएमओने सांगितले आहे. प्रकाश जावडेकर यांनी सर्वच विद्यापीठांचे कुलपती व कुलगुरू यांच्या नेमणुका पूर्ण केल्या आहेत आणि आश्वासनानुसार नवे शैक्षणिक धोरणही तयार केले आहे. आयोगाने निवडणुकांची घोषणा केली की, आचारसंहिता लगेच लागू होईल आणि मग प्रकल्पांची उद्घाटने वा पायाभरणी समारंभ करता येणार नाहीत. नव्या योजनांचीही घोषणा करता येणार नाही. त्यामुळे नव्या योजनांची घोषणाही लगेच करून टाका, असे मंत्रालयांना सांगण्यात आले आहे.>श्रमयोगी मानधन योजना आज होणार जाहीर?आपण ज्या उद्घाटन व पायाभरणी कार्यक्रमांना जात आहोत, तिथे संबंधित खात्याच्या मंत्र्याने उपस्थित राहण्याचे कारण नाही. त्याऐवजी तुम्हीच तुमच्या कार्यक्रमांचा धडाका सुरू करा, असे पंतप्रधानांनी कार्यालयामार्फत सर्व मंत्र्यांना कळविले आहे. पंतप्रधान दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून, तिथे ते मंगळवारी पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेची घोषणा करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९