पंतप्रधान मोदींची 'मेट्रो' राईड

By Admin | Updated: April 25, 2015 11:16 IST2015-04-25T11:16:42+5:302015-04-25T11:16:55+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पहिल्यांदाच 'मेट्रो' राईडचा अनुभव घेतला. मोदीनी धौलाकुवा ते द्वारका स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला.

Prime Minister Modi's Metro Ride | पंतप्रधान मोदींची 'मेट्रो' राईड

पंतप्रधान मोदींची 'मेट्रो' राईड

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पहिल्यांदाच 'मेट्रो' राईडचा अनुभव घेतला. मोदीनी धौलाकुवा ते द्वारका स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला. ट्विटरवरून आपल्या प्रवासाबद्दल सांगत मोदींनी काही फोटोही शेअर केले आणि मेट्रोमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या ई. श्रीधरन यांचे आभारही मानले. 'श्रीधरन मला नेहमी दिल्ली मेट्रोतून प्रवास करण्यास सांगत असत. अखेर आज तो योग जुळून आला आणि मला मेट्रोतून प्रवास करायची संधी मिळाली ', असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 
द्वारका येथे होणा-या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधानांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची निवड केली. खुद्द पंतप्रधान मेट्रोन प्रवास करत आहेत, हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. दिल्ली मेट्रो सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच देशाच्या पंतप्रधानांनी मेट्रोने प्रवास केला आहे. 

Web Title: Prime Minister Modi's Metro Ride