पंतप्रधान मोदींच्या जिवाला धोका

By Admin | Updated: July 5, 2015 04:15 IST2015-07-05T04:15:20+5:302015-07-05T04:15:20+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४० संघटनांकडून धोका असून, मुस्लिम दहशतवाद्यांसोबतच कट्टर हिंदुत्ववाद्यांचेही ते लक्ष्य असल्याचा दावा दिल्ली पोलिसांच्या एका गुप्तचर अहवालात करण्यात आला आहे.

Prime Minister Modi's life risk | पंतप्रधान मोदींच्या जिवाला धोका

पंतप्रधान मोदींच्या जिवाला धोका

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४० संघटनांकडून धोका असून, मुस्लिम दहशतवाद्यांसोबतच कट्टर हिंदुत्ववाद्यांचेही ते लक्ष्य असल्याचा दावा दिल्ली पोलिसांच्या एका गुप्तचर अहवालात करण्यात आला आहे.
या ४० संघटनांमध्ये विविध दहशतवादी संघटनांसोबतच नक्षलवादी, ईशान्येकडील बंडखोर आणि अंडरवर्ल्डचाही समावेश आहे.
गेल्या २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिनी हवाई हल्ल्याची भीती वर्तविण्यात आली होती. त्या अनुषंगाने दिल्लीतील राजपथ आणि आजूबाजूच्या परिसरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेने हा अहवाल तयार केला होता. या अहवालानुसार लष्कर-ए-तोयबा, इंडियन मुजाहिदीन आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांसोबतच काही कट्टररपंथी हिंदुत्ववादी संघटनांकडूनही मोदींच्या जीवाला धोका आहे.
मोदी हे मुस्लिमांना आकर्षित करण्यासाठी अवाजवी प्रयत्न करीत असल्याचे काही हिंदुत्ववादी संघटनांचे मत झाले आहे. शिवाय गुजरात दंगलप्रकरणात अनेक हिंदू नेत्यांना शिक्षा झाली हे सुद्धा एक कारण आहे.
योगदिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेसंबंधी अहवाल तयार करताना धोक्याचा हा नवा पैलू लक्षात आल्याचे दिल्ली पोलिसातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
हिंदुत्ववाद्यांकडून धोका नाही
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंदुत्ववादी तत्त्वांकडून धोका असल्याचे वृत्त केंद्रीय गृह मंत्रालयाने फेटाळले आहे.
यासंदर्भातील वृत्त निराधार असून असा कुठलाही अहवाल आला नसल्याचा दावा मंत्रालयातील सूत्रांनी केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Prime Minister Modi's life risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.