शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींनी वाचला काँग्रेसी नेत्यांच्या अपशब्दांचा पाढा, साप, विंचू आणि डॅश डॅश डॅश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 21:25 IST

मणिशंकर अय्यर यांच्या विधानावरून भाजपाच्या आघाडीच्या नेत्यांनी आज काँग्रेसवर जोरदार हल्ले केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याविरोधात काढलेल्या अपशब्दांचा पाढा जाहीर सभेत वाचत काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला.

अहमदाबाद -  काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले नेते मणिशंकर अय्यर यांनी मोदींचा उल्लेख नीच असा केल्यापासून गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या हाती आयता मुद्दा मिळाला आहे. मणिशंकर अय्यर यांच्या विधानावरून भाजपाच्या आघाडीच्या नेत्यांनी आज काँग्रेसवर जोरदार हल्ले केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याविरोधात काढलेल्या अपशब्दांचा पाढा जाहीर सभेत वाचत काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस मला शिव्याशाप देऊन थकत नाही, पण मी शांत राहतो, असे सांगत मोदींनी मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला.  शुक्रवारी एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, काँग्रेसने मला पहिल्यांदा नीच म्हटलेले नाही. सोनिया गांधी आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी याआधीही असे केले आहे. मी नीच का आहे? कारण मी गरीबाच्या घरी जन्माला आलोय. कारण माझी जात खालची आहे. कारण मी गुजराती आहे. हीच कारणे आहेत का माझा द्वेश करण्यासाठी." गुजरातमध्ये शनिवारी पहिल्या फेरीचे मतदान होणार आहे. तर 14 डिसेंबर रोजी दुसऱ्या फेरीचे मतदान होईल.  त्याआधी आज सकाळी झालेल्या सभेतही मोदींनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला होता.  2015 साली मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या पाकिस्तान दौ-यात  नरेंद्र मोदींना मार्गातून हटवा असे विधान केले होते. अय्यर यांच्या त्याच विधानाचा धागा पकडून मोदींनी काँग्रेसची कोंडी केली. मोदींना मार्गातून हटल्यानंतरच भारत-पाकिस्तानमध्ये शांतीसंबंध सुधारु शकतात असे अय्यर त्यांच्या पाकिस्तान दौ-यात म्हणाले होते. मला मार्गातून हटवायचे म्हणजे नेमके काय? अय्यर यांना नेमके काय म्हणायचे होते? माझा गुन्हा काय? आम्हाला लोकांचा आशिर्वाद आहे असे मोदी म्हणाले. पाकिस्तानातील एका टॉक शो मध्ये बोलताना अय्यर यांनी हे विधान केले होते.  भारत-पाकिस्तान संबंधात निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी काय करावे लागेल असा प्रश्न पाकिस्तानी वाहिनीच्या अँकरने विचारला होता. त्यावर अय्यर यांनी सर्वात प्रथम मोदींना हटवले पाहिजे त्यानंतरच चर्चा पुढे जाऊ शकते असे उत्तर दिले होते. आपल्याला अजून चारवर्ष थांबावे लागेल. मोदी असताना भारत-पाकिस्तानसंबंध सुरळीत होतील असे आपल्याला वाटत नाही असे अय्यर म्हणाले होते. अय्यर यांनी भारतात परतल्यानंतर असे कुठलेही विधान केल्याचे नाकारले होते. गुजरात निवडणुकीच्या मतदानाला दोन दिवस उरले असताना अय्यर यांनी केलेल्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातMani Shankar Aiyarमणिशंकर अय्यर