शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

पंतप्रधान मोदीच जाणार उपोषणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 6:33 AM

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचे सर्व दिवस विरोधी पक्षांनी गोंधळ घालून वाया घालविल्याचे नैतिक पाप विरोधी पक्षांच्या माथी मारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शहा गुरुवारी १२ एप्रिल रोजी एक दिवसाचा ‘निषेध उपोषण’ करणार आहेत.

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचे सर्व दिवस विरोधी पक्षांनी गोंधळ घालून वाया घालविल्याचे नैतिक पाप विरोधी पक्षांच्या माथी मारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शहा गुरुवारी १२ एप्रिल रोजी एक दिवसाचा ‘निषेध उपोषण’ करणार आहेत.मोदी राजधानी दिल्लीत उपोषण करतील, तर कर्नाटकात निवडणूक प्रचार करीत असलेले शहा हुबळी येथे दिवसभराचा उपवास करतील, असे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. मोदी १२ तारखेला उपोषण करणार असले, तरी दिवसभराची त्यांची ठरलेली सरकारी कामे नित्याप्रमाणे सुरू राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले.गेल्या शुक्रवारी भाजपाच्या स्थापना दिन कार्यक्रमात संसदेचे अधिवेशन वाया गेल्याचा ठपका काँग्रेसवर ठेवत, मोदी यांनी या विरोधी पक्षाने लोकशाहीतील सर्वात खालची पातळी गाठल्याचा आरोप केला होता. याचा निषेध म्हणून भाजपाचे सर्व खासदार गुरुवारी ११ एप्रिल रोजी एक दिवसाचे उपोषण करतील, असेही मोदी यांनी संसदीय पक्षाच्या बैठकीत जाहीर केले होते. भाजपाच्या वाढत्या ताकदीने पोटदुखी झालेली काँग्रेस देशाचे हित बाजूला ठेवून मुद्दाम फुटपाडू आणि नकारात्मक राजकारण करत असल्याचा आरोप करून, मोदी यांनी भाजपाच्या सर्व खासदारांना व मंत्र्यांना गावोगाव जाऊन सरकारने केलेल्या कल्याणकारी कामांची माहिती देण्यासही सांगितले होते. भाजपाच्या या खेळीला नैतिक काटशह देण्यासाठी काँग्रेसने देशात सांप्रदायिक सलोखा टिकून राहावा, यासाठी भाजपाच्या आधीच ९ एप्रिल रोजी देशव्यापी उपोषण आयोजित केले होते.संसद अधिवेशन वाया घालविल्याचा ठपका काँग्रेसच्या माथी बसावा, यासाठी संसदीय कामकाजाच्या वाया गेलेल्या २३ दिवसांच्या वेतन व भत्त्यांची ३.६६ कोटी रुपयांची रक्कम भाजपा खासदार घेणार नाहीत, असे संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जाहीर केले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीagitationआंदोलन