पाकच्या पंतप्रधानांनी मोदींना पाठविले आंबे
By Admin | Updated: July 22, 2015 23:57 IST2015-07-22T23:57:13+5:302015-07-22T23:57:13+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी ईदनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंब्यांचा पेटारा भेट म्हणून पाठवला. गतवर्षी शरीफ यांनी मोदी

पाकच्या पंतप्रधानांनी मोदींना पाठविले आंबे
नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी ईदनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंब्यांचा पेटारा भेट म्हणून पाठवला. गतवर्षी शरीफ यांनी मोदी व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासाठी आंबे पाठवले होते.
विशेष म्हणजे सीमेवर भारतीय लष्कर आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यात यावेळी ईदनिमित्त मिठाईची देवाण-घेवाण झालेली नाही. उभय देशांत सणावारी मिठाई देण्याची परंपरा आहे. ही परंपरा सीमेवरील तणावामुळे प्रथमच खंडित झाली.
गत काही दिवसांपासून पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन चालवले आहे. असे असताना भारत शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत असल्याचा कांगावा पाकिस्तान करीत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)