पंतप्रधान मोदी मायदेशी परतले
By Admin | Updated: August 5, 2014 02:44 IST2014-08-05T02:44:55+5:302014-08-05T02:44:55+5:30
दोन दिवसांच्या नेपाळच्या ऐतिहासिक दौ:यावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी मायदेशी परतले.

पंतप्रधान मोदी मायदेशी परतले
काठमांडू : दोन दिवसांच्या नेपाळच्या ऐतिहासिक दौ:यावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी मायदेशी परतले. द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी सहकार्य, संपर्क, संस्कृती आणि संविधान (4-सी) यावर प्रामुख्याने भर देणा:या त्यांच्या या दौ:यात 195क् चा शांतता आणि मैत्री कराराचा आढावा घेऊन समायोजनासह अद्ययावत करण्याचे उभय देशांनी मान्य केले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या दौ:यानंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात अन्य द्विपक्षीय करारांचाही नव्याने आढावा घेण्याची तयारी उभय देशांनी दाखविली आहे.
दोन्ही पंतप्रधानांनी संबंधित अधिका:यांना वीज क्षेत्रतील व्यापार करारासंदर्भातील वाटाघाटी 45 दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. महाकाली नदीवर एक बहुपदरी पूल उभारण्यासाठी भारत मदत करणार आहे. (वृत्तसंस्था)
मोदींकडून पशुपतीनाथ
मंदिरात विशेष पूजा
काठमांडू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथील प्राचीन पशुपतीनाथ मंदिरात विशेष पूजा केली.
श्रवणी अष्टमीच्या पावन दिनी महादेवाच्या दर्शनासाठी आलेले मोदी 45 मिनिटे मंदिरात होते. पाचव्या शतकातील या प्रसिद्ध मंदिरात पूजा केल्यानंतर मोदींनी टि¦ट केले की, पशुपतीनाथ मंदिरात आज सकाळी पूजा करून मी धन्य झालो. त्यांनी पशुपतीनाथ मंदिराला अडीच हजार किलो चंदन दान केले.
एका पुजा:याने सांगितले की, मोदींच्या विशेष पूजेत 15क् पुजा:यांनी सहभाग घेतला. मोदींनी शंकराच्या पिंडीला रुद्राभिषेक आणि पंचामृत अभिषेक केला. मोदी भगवे वस्त्र परिधान करून आले होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष माळा होती. (वृत्तसंस्था)