पंतप्रधान मोदी आईला भेटले : गाजावाजा कशाला

By Admin | Updated: January 11, 2017 01:15 IST2017-01-11T01:15:53+5:302017-01-11T01:15:53+5:30

व्हायब्रंट गुजरातसाठी त्या राज्याच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणे योगासने करण्याचे

Prime Minister Modi met the mother: Gajavaja Kasha | पंतप्रधान मोदी आईला भेटले : गाजावाजा कशाला

पंतप्रधान मोदी आईला भेटले : गाजावाजा कशाला

नवी दिल्ली : व्हायब्रंट गुजरातसाठी त्या राज्याच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणे योगासने करण्याचे टाळले आणि त्याऐवजी आईची भेट घेतली. स्वत: पंतप्रधानांनी टिष्ट्वटरवरून ही माहिती दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र, पंतप्रधानांच्या टिष्ट्वटची खिल्ली उडवली.
केजरीवाल आपल्या ट्विटमध्ये म्हणतात : मी माझ्या आईसोबतच राहतो. रोज तिचा आशीर्वाद घेतो. मात्र त्याचा गाजावाजा करत नाही. राजकारणासाठी मी माझ्या आईला बँकेच्या रांगेतही उभे करत नाही. हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती सांगते की आपली वयोवृद्ध आई आणि धर्मपत्नीला स्वत:सोबत ठेवले पाहिजे.
पंतप्रधानांचे निवासस्थान खूप मोठे आहे. त्यांनी आपले हृदयही थोडे मोठे करायला हवे. त्यांनी खरे तर आपली आई आणि पत्नी यांना तिथे न्यावे, असे त्यांनी सुचविले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Prime Minister Modi met the mother: Gajavaja Kasha