पंतप्रधानांना पवार भेटले
By Admin | Updated: July 1, 2014 02:10 IST2014-07-01T02:10:16+5:302014-07-01T02:10:16+5:30
लांबलेला पाऊस आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम हे दोन विषय घेऊन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी भेट घेतली.

पंतप्रधानांना पवार भेटले
>रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
लांबलेला पाऊस आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम हे दोन विषय घेऊन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी भेट घेतली.
श्रीहरिकोट्टा येथून पंतप्रधान परतल्यावर त्यांनी देशाच्या पावसाळी स्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान कार्यालयाने कृषी, जलसंधारण, सहकार व हवामान विभागाच्या वरिष्ठांशी चर्चा केली. त्यानंतर पवार यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. उभयतांमध्ये देशातील दुष्काळजन्य स्थितीविषयी चर्चा झाली की, राजकीय ‘हवामाना’वर हे मात्र कळु शकले नाही. कारण पवारांसोबत अन्य कोणीच नव्हते. पवारांनी एक निवेदन पंतप्रधानांना दिल्याचे सांगण्यात आले.
कृषीविभागातील सूत्रंनी सांगितले, की दक्षिण भारत सोडून इतर इतर ठिकाणी मुक्य जलाशयांची साठवण क्षमता सध्या तरी योग्य आहे. महाराष्ट्रातील तापी, गोदावरी, वैनगंगा, कोयना, पंचगंगा व वर्धा या नद्यांची स्थिती योग्य असून त्यांच्या साठवण क्षमतेत अजून ओलावा आहे, असा स्थितीदर्शक अहवाल केंद्रीय जलआयोगाने केंद्रीय जलसंधारण मंत्रलायाला दिला आहे. मात्र आपात्कालीन योजनांवर तात्काळ लक्ष देण्याची सूचना पंतप्रधानांनी केल्याची माहिती देऊन या सूत्रने सांगितले, की शेतक:यांसाठी डीजल अनुदान, विवध केंद्रीय योजनांच्या माध्यमातून बियाणो अनुदानाच्या मर्यादेत वाढ, दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण होणार असेल तर कमी व्याजदर योजना, त्वरीत चारा विकास कार्यक्रम हाती घेण्याची तयारी होत आहे.