शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
4
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
5
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
6
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
7
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
8
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
9
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
10
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
11
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
13
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
14
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
15
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
16
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
17
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
18
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
19
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
20
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  

बिहारच्या गया मतदरासंघात मांझींसाठी पंतप्रधान उतरले प्रचारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 06:54 IST

माजी मुख्यमंत्री व माजी मंत्र्यांची हायप्राेफाईल लढत होणार चुरशीची

राजेश शेगाेकारलोकमत न्यूज नेटवर्कपाटणा : बुद्धभूमी म्हणून विख्यात असलेल्या गया मतदारसंघात हाय प्राेफाईल लढत हाेत आहे. एनडीएमध्ये हम म्हणजेच हिंदुस्थान अवाम मोर्चाला केवळ एक जागा मिळाली असून या जागेवर  माजी मुख्यमंत्री जतीनराम मांझी हे रिंगणात आहेत. दाेन पराभव पत्करल्यानंतर आता त्यांची तिसऱ्यांदा अग्नीपरिक्षा आहे.  महागठबंधन मधून राजदचे माजी मंत्री कुमार सर्वजीत रिंगणात आहेत. त्यांचे वडील राजेश कुमार यांनी १९९१ मध्ये  याच मतदारसंघात माझी यांना पराभूत केलेे हाेते हे विशेष. 

येथे सर्वाधिक मतदार मांझी समाजाचे आहेत त्यामुळे मांझी समाजाचे उमेदवार विजयी होत आले आहेत.  जदयुचे विजय मांझी विद्ममान खासदार आहेत तर भाजपाचीही ताकद माेठी आहे त्यामुळे राजद समाेर एनडीचे तगडे आव्हान उभे ठाकले आहे. स्व:ता माेदी मांझी यांच्यासाठी १६ एप्रिलला रॅली करत आहेत. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

पर्यटन आणि तीर्थयात्रेचे आंतरराष्ट्रीय स्थळ असूनही, विकासाचा अभाव,गरिबी, बेरोजगारी तसेच शहरीकरणाच्या समस्यांवर मात करता आलेली नाही. शेती आणि लघु व्यापार हेच उत्पन्नाचे सर्वाधीक स्त्राेत आहे त्याकडे दुर्लक्ष  शेरघाटी, बाराछत्ती आणि बोधगयाअसे अनेक भाग नक्षलग्रस्त आहेत नक्षलवाद कमजाेर झालेला नाही डोभी-पाटणा चौपदरीकरण. विअर धरण, विमानतळ विस्तारीकरण, उत्तरन  प्रकल्पाच्या कामांची मागणी आहेगया तिलकुटसाठी (तीळपट्टी) प्रसिद्ध आहे.मात्र कापड गिरणी, साखर कारखाने बंद,आरोग्य आणि शिक्षणाची स्थिती गंभीर आहे. मगध मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलसाठी अनेक घोषणा प्रत्यक्षात आल्या नाहीत

काँग्रेसने या मतदारसंघातून सहा वेळा विजय मिळवला; डेमोक्रॅटिक सोशालिस्ट पार्टी,जनसंघ,जनता पक्ष,राजद एकदा,जनता दल व भाजप चार वेळा जिंकलेआहे.

 

टॅग्स :bihar lok sabha election 2024बिहार लोकसभा निवडणूक निकाल २०२४gaya-pcगेलेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा