महाराष्ट्राने पटकावला पंतप्रधान बॅनर

By Admin | Updated: January 29, 2015 01:52 IST2015-01-29T01:52:15+5:302015-01-29T01:52:15+5:30

नॅशनल कॅडेट कॉर्प्स(एनसीसी)चा सर्वोच्च बहुमान असणा-या पंतप्रधान बॅनरचे उपविजेतेपद महाराष्ट्राला मिळाले आहे.

Prime Minister Banner | महाराष्ट्राने पटकावला पंतप्रधान बॅनर

महाराष्ट्राने पटकावला पंतप्रधान बॅनर

नवी दिल्ली : नॅशनल कॅडेट कॉर्प्स(एनसीसी)चा सर्वोच्च बहुमान असणा-या पंतप्रधान बॅनरचे उपविजेतेपद महाराष्ट्राला मिळाले आहे. बुधवारी येथील कॅन्टॉनमेंट भागातील डीजी एनसीसी परेड ग्राऊंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंजाबला विजेतेपदाचा तर महाराष्ट्राला उपविजेतेपदाचा पुरस्कार देण्यात आला.
यंदाच्या प्रजासत्ताक दिन पथ संचलनात महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाच्या अमन जगताप या कॅडेटने देशभरातील १४४ कॅडेटसचे नेतृत्व करून महाराष्ट्राला सलग दुस-यांदा हा बहुमान मिळवून दिला. महाराष्ट्रातील ३७ मुली व ७६ मुलांसह एकूण ११३ एनसीसी कॅडेटसनी या शिबीरात सहभाग नोंदवला होता. कर्नल शहाजी जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे उपप्रमुख मेजर आर.आर.शिंदे कॅप्टन सुजाता थोरात यांचा या एनसीसी पथकात समावेश होता.
प्रजासत्ताक दिनानिमित्त १ जानेवारी २०१५ पासून एनसीसी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील १७ एनसीसी विभागातील २०७० कॅडेट्सनी यात भाग घेतला. शिबीरातील विविध स्पर्धांमध्ये अव्वल क्र मांक पटकविणा-या विभागाला पंतप्रधानांच्या हस्ते पंतप्रधान बॅनर या बहुमानाने सन्मानित करण्यात येते. आतापर्यंत पार पडलेल्या २३ एनसीसी शिबीरामध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक १७ वेळा हा बहुमान मिळाला असून, आज महाराष्ट्राला हा बहुमान मिळाला असता तर ५ वर्षांपासून सतत पंतप्रधान बॅनरचे विजेतेपद पटकाविणा-या महाराष्ट्राला वर्चस्वाची विक्रमी नोंद करता आली असती. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Prime Minister Banner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.