पंतप्रधान, उपराष्ट्रपती घरातल्या भुयारातून जाणार नव्या संसद भवनात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 06:17 AM2021-03-05T06:17:08+5:302021-03-05T06:17:18+5:30

सुरक्षाव्यवस्थेवरील ताण होणार कमी

Prime Minister and the Vice President will pass through the basement of the house to the new Parliament House | पंतप्रधान, उपराष्ट्रपती घरातल्या भुयारातून जाणार नव्या संसद भवनात

पंतप्रधान, उपराष्ट्रपती घरातल्या भुयारातून जाणार नव्या संसद भवनात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : नव्याने बांधण्यात येणाऱ्या संसद भवनाखाली तीन मोठी भुयारे असणार आहेत. पंतप्रधान व उपराष्ट्रपतींच्या नवीन घरांना तसेच नव्या संसद भवनातील खासदारांच्या कक्षांना ही भुयारे जोडली जातील. तिथून या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ये-जा सुरू झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवरील ताणही कमी होणार आहे. 


गोल्फ मैदानावर ज्या गाड्या (गोल्फ कार्ट) वापरल्या जातात, त्यांचा वापर या भुयारातून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना नव्या संसद इमारतीत आणण्यासाठी व तिथून परत नेण्यासाठी करता येईल. नवे संसद भवन बांधण्याच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात साऊथ ब्लॉकच्या दिशेला पंतप्रधानांचे नवे निवासस्थान व त्यांचे नवे कार्यालय बांधले जाईल. उपराष्ट्रपतींचे नवे निवासस्थान नॉर्थ ब्लॉकच्या दिशेला असेल. राष्ट्रपतींनी संसदेत येण्याचे प्रसंग खूप कमी येतात. त्यामुळे राष्ट्रपती भवन ते नवीन संसद भवन या दरम्यान भुयार बांधण्याचा अद्याप तरी विचार नाही. सेंट्रल व्हिस्टा प्रॉजेक्टची घोषणा केंद्र सरकारने सप्टेंबर २०१९ मध्ये केली. नव्या संसद भवनामध्ये ९०० ते १२०० खासदारांची बसण्याची सोय असेल. त्याशिवाय नवे संयुक्त सचिवालय बांधण्यात येणार आहे. राष्ट्रपती भवन ते इंदिरा गेट या दरम्यानच्या ३ किमीच्या राजपथाची पुन्हा नव्याने बांधणी करण्यात येईल. 


ऑगस्ट २०२२ पर्यंत प्रकल्प पूर्ण होण्याची आशा
n नवे संसद भवन बांधण्याच्या कामास सुरुवात झाल्यानंतर त्या परिसरातील सरकारी कार्यालयांचे नजीकच्या चार ठिकाणी तात्पुरते स्थलांतर करण्यात येणार आहे. २०२२ साली १५ ऑगस्टला देशाचा ७५वा स्वातंत्र्य दिन आहे. तोवर नवीन संसद भवन बांधून पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. 
n संसदेचे २०२२ सालातील पावसाळी अधिवेशन नव्या संसद भवनात भरविण्याचा मोदी सरकारचा विचार आहे.

Web Title: Prime Minister and the Vice President will pass through the basement of the house to the new Parliament House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.