शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदीही कॉल ड्रॉपनं हैराण; दूरसंचार विभागाची कानउघाडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 11:23 IST

दिल्ली विमानतळाहून निवासस्थानी जाताना मोदींना कॉल ड्रॉपचा फटका

नवी दिल्ली: देशातील सर्वसामान्य जनतेला दैनंदिन जीवनात अनेकदा कॉल ड्रॉपचा सामना करावा लागतो. त्यामुळे कॉल ड्रॉपची समस्या सर्वसामान्य जनतेसाठी काही नवी नाही. मात्र आता पंतप्रधाननरेंद्र मोदींनादेखील या समस्येचा फटका बसला आहे. दिल्ली विमानतळाहून आपल्या सरकारी निवासस्थानी जाताना मोदींना फोनवर बोलताना कॉल ड्रॉपमुळे मनस्ताप सहन करावा लागला. यानंतर त्यांनी दूरसंचार विभागाची कानउघाडणी करत ही समस्या सोडवण्याच्या सूचना दिल्या. पंतप्रधान मोदी प्रगती उपक्रमाच्या अंतर्गत वरिष्ठ सचिवांशी दर महिन्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधतात. यावेळी मोदींनी दूरसंचार सचिव अरुण नटराजन यांना कॉल ड्रॉपच्या समस्येची माहिती दिली. कॉल ड्रॉप समस्या कशी सोडवली जाऊ शकते, यात लक्ष घाला. ग्राहकांना चांगली सेवा देणं ही मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांनी जबाबदारी आहे, असं मोदींनी नटराजन यांना सांगितलं. दिल्ली विमानतळावर उतरल्यावर लोक कॉल करण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यावेळी त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो, असा अनुभव यावेळी मोदींनी सांगितला. कॉल ड्रॉप आता राष्ट्रीय समस्या झाली आहे, असं मोदींनी नटराजन यांना सांगितलं. कॉल ड्रॉप झाल्यावर मोबाईल कंपन्यांकडून किती दंड वसूल केला जातो, याचीही माहिती मोदींनी घेतली. यावेळी दर तीन कॉल ड्रॉपला मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांकडून एक रुपया दंड आकारला जाण्याचा कायदा प्रस्तावित आहे. मात्र हा कायदा लागू झालेला नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मोदींना दिली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानBJPभाजपा