West Bengal election 2021: सत्तेत येताच ममता सरकार सर्वात पहिले काय करणार? टीएमसी नेत्यानं सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 04:49 PM2021-05-02T16:49:40+5:302021-05-02T16:50:37+5:30

हकीम हे कोलकाता पोर्ट येथून निवडणुकीच्या आखाड्यात होते. येथे त्यांचा सामना भाजपच्या किशोर गुप्ता यांच्याशी होता. सहाव्या टप्प्यातील मतमोजणीनंतर ते 33,071 मतांनी आघाडीवर होते.

Primary task of new TMC government will be to put health system back on track firhad hakim | West Bengal election 2021: सत्तेत येताच ममता सरकार सर्वात पहिले काय करणार? टीएमसी नेत्यानं सांगितलं!

West Bengal election 2021: सत्तेत येताच ममता सरकार सर्वात पहिले काय करणार? टीएमसी नेत्यानं सांगितलं!

Next

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. यातच, तृणमूलचे वरिष्ठ नेते तथा मावळे शहर विकास मंत्री फरहाद हकीम यांनी रविवारी कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य स्थिती पुन्हा एकदा रुळावर आणण्यास नव्या सरकारचे प्राधान्य असेल, असे म्हटले आहे. (Primary task of new TMC government will be to put health system back on track firhad hakim)

हकीम म्हणाले, सत्तेत आल्यानंतर कोरोना महामारीचे संकट पाहता तृणमूल काँग्रेसच्या खांद्यावरील जबाबदारीचे ओझे आणखी वाढेल आणि यामुळे विजयाचा उत्सव मागे सोडावा लागेल. आम्ही दोन तृतियांश मतांनी निवडणूक जिंकू आणि बंगालमध्ये सरकार स्थापन करू. ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा आमच्या मुख्यमंत्री बनतील. हा विजय सर्वसामान्य जनतेचा असेल. आमचा विजय आमच्या खांद्यांवर मोठी जबाबदारी घेऊन येईल.''

west bengal election result 2021: ममतांच्या विजयानं राहुल गांधींचं टेंशन वाढणार! आता सोनिया गांधी कोणती खेळी खेळणार?

हकीम म्हणले, ते एका रुग्णालयातून दुसर्‍या रुग्णालयात जात आहेत आणि तेथील सुविधांचा आढावा घेत आहेत. गरजू रूग्णांना मदत करत आहेत. आमचे प्राधान्य आरोग्य व्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यास राहील. हे अत्यंत आव्हानात्मक आहे, हे मला ठाऊक आहे. सध्या मी मंत्री नाही. मात्र, प्रत्येक रुग्णालयाला भेटी देत आहे. मी माझ्या जबाबदारीपासून मागे हटू शकत नाही.''

हकीम हे कोलकाता पोर्ट येथून निवडणुकीच्या आखाड्यात होते. येथे त्यांचा सामना भाजपच्या किशोर गुप्ता यांच्याशी होता. सहाव्या टप्प्यातील मतमोजणीनंतर ते 33,071 मतांनी आघाडीवर होते.

ममता बॅनर्जी सलग तिसऱ्यांदा बंगालच्या CM पदावर बसणे जवळपास निश्चित - 
ममता बॅनर्जी यांचे सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणे जवळपास निश्चित झाले आहे. भाजपने संपूर्ण तागदीनिशी बंगाल विधानसभा निवडणूक लढली होती. भाजपने येथे आपण 200 हून अधिक जागा जिंकू, असा दावा केला होता. मात्र, त्यांना दाव्याप्रमाणे यश मिळाले नाही.

West Bengal Election Result 2021: जमीन हिलाने वाली जीत मुबारक दीदी, भारीच...; केजरिवालांकडून ममतांना खास अंदाजात शुभेच्छा

ममता बनू शकतात विरोधी पक्षांचा सर्वात मोठा चेहरा - 
2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून विरोधी पक्षांत नेतृत्वाचा आभाव दिसत आहे. तेथे सर्वमान्य असा नेताच नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये ममतांची हॅट्ट्रीक झालीच, तर त्या विरोधी पक्षांचा सर्वात मोठा चेहरा बनतील.

विरोधी पक्षांत ममतांच्या बरोबरचीचं कुणीच नाही -
विरोधी पक्षांत मोठ्या चेहऱ्याचा विचार करता, राहुल गांधींशिवाय, सपा प्रमुख अखिलेश यादव, बीएसपी प्रमुख मायावती, जेडीएसचे एचडी कुमारस्वामी, कम्यूनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, अशा अनेक नेत्यांची नावे सांगता येतील. मात्र, यांपैकी कुणीही भाजपचा थेट सामना करण्यास सक्षम दिसत नाही. अशावेळी केवळ एकच चेहरा दिसतो, तो म्हणजे ममता बॅनर्जी. ज्या थेट सामन्यात भाजपला पराभूत करताना दिसत आहेत.

 

Web Title: Primary task of new TMC government will be to put health system back on track firhad hakim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.