शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आधीच्या सरकारने फक्त गृहमंत्री बदलण्याचं काम केलं - नरेंद्र मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 16:21 IST

ज्यांच्या रक्तात भारत आहे, त्यांना एअर स्ट्राइकवर संशय येईल का ? जे भारत माता की जय बोलतात ते या संशय येईल का ?  जे लोक स्ट्राइकवर संशय उपस्थित करतात त्यांच्यावर भरोसा ठेवणार का ? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला

ग्रेटर नोएडा - ज्यांच्या रक्तात भारत आहे, त्यांना एअर स्ट्राइकवर संशय येईल का ? जे भारत माता की जय बोलतात ते या संशय येईल का ?  जे लोक स्ट्राइकवर संशय उपस्थित करतात त्यांच्यावर भरोसा ठेवणार का ? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित जनसमुदायाला विचारला. पुलवामा हल्ल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून एअर स्ट्राइकवर संशय उपस्थित करण्यात आले होते, त्यावर बोलताना नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा समाचार घेतला. 

 

14 फेब्रुवारीला पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या सीमेपार घुसत बालकोट भागातील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. या हल्ल्यांवर विरोधकांनी संशय उपस्थित केले मात्र ज्यावेळी हा हल्ला केला त्यानंतर पाकिस्तानात मोदींनी दहशतवाद्यांना मारले असं बोललं जात होतं परंतु भारतातील काही लोक या हल्ल्यावर प्रश्न विचारत होते असं मोदी यांनी भाषणात सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात म्हणाले की, आज देशात स्वत:ला मोठे मानणारे नेते जी  भाषा वापरत आहे त्यामुळे आपल्या शत्रू राष्ट्राला त्याची मदत होतेय. देशातील जवानांच्या शौर्यावर प्रश्न निर्माण केले जात असताना पाकिस्तानात त्यांच्या वक्तव्यावर टाळ्या मिळतात. एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तान दबावाखाली आहे. मात्र शंका उपस्थित करणारी माणसे बालकोट भारतात आहे की पाकिस्तानात यावर चर्चा करत राहिले. 

जशास तसे उत्तर देणार 2016 मध्ये पहिल्यांदा आमचे सरकार आल्यानंतर दहशतवाद्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिलं गेलं, उरी हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राइक केला त्याचे पुरावे हे लोक मागत आहेत. आता पुलवामा हल्ल्यानंतरही भारतीय जवानांनी जे साहसाचे काम केले ते गेल्या कित्येक वर्ष झाले नाही. आमच्या जवानांनी दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांना ठार मारलं. 

आधीच्या सरकारने फक्त गृहमंत्री बदलले शत्रूच्या मनात भारताविषयी जे विचार त्यासाठी 2014 पूर्वीच्या सरकारचं अपयश आहे. 26 नोव्हेंबर झालेला मुबंईवरील हल्ला कोणी विसरु शकत नाही. त्यावेळीच दहशतवाद्यांच्या विरोधात ठोस कारवाई करणे गरजेचे होते. मात्र सरकार गप्प बसून राहिली. त्यावेळी जवानांचे रक्त उसळत होते तेव्हा दिल्ली शांत होती. त्यामुळेच 26/11 नंतरही देशावर अनेक दहशतवादी हल्ले झाले. आधीचे सरकार धोरण बदलत नव्हती तर फक्त गृहमंत्री बदलत होती असा आरोप मोदी यांनी केला. त्याचसोबत हा पूर्वीचा भारत नाही तर नवीन भारत आहे, जो दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देईल असा इशाराही मोदी यांनी दिला. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीairforceहवाईदलpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाcongressकाँग्रेसdelhiदिल्लीPakistanपाकिस्तान