शिशु संगोपन संस्थेच्या पदाधिका-यांचा अटकपूर्व जामीन रद्द
By Admin | Updated: December 31, 2014 18:56 IST2014-12-31T00:06:15+5:302014-12-31T18:56:06+5:30
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील मौजे सुसरे येथील शिशु संगोपन संस्थेचे पदाधिकारी एका शिक्षकाच्या आत्महत्येच्या गुन्ात आरोपी आहेत. त्यांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. संस्थाचालकांच्या छळास कंटाळून संस्थेला जमीन दान करणारे पांडुरंग आश्रु क्षीरसागर यांनी आत्महत्या केली होती. त्यामध्ये रतीलाल धोंडिबा कासवा, मुख्याध्यापक अशोक साहेबराव सपाटे, सचिव दथरथ सखाराम खोसे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने रद्द केला. या प्रकरणात फिर्यादीतर्फे ॲड. विजय भगत, ॲड. अभिषेक भगत यांनी तर सरकारी पक्षातर्फे ॲड. सुरेश लगड यांनी बाजू मांडली.

शिशु संगोपन संस्थेच्या पदाधिका-यांचा अटकपूर्व जामीन रद्द
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील मौजे सुसरे येथील शिशु संगोपन संस्थेचे पदाधिकारी एका शिक्षकाच्या आत्महत्येच्या गुन्ह्यात आरोपी आहेत. त्यांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. संस्थाचालकांच्या छळास कंटाळून संस्थेला जमीन दान करणारे पांडुरंग आश्रु क्षीरसागर यांनी आत्महत्या केली होती. त्यामध्ये रतीलाल धोंडिबा कासवा, मुख्याध्यापक अशोक साहेबराव सपाटे, सचिव दथरथ सखाराम खोसे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने रद्द केला. या प्रकरणात फिर्यादीतर्फे ॲड. विजय भगत, ॲड. अभिषेक भगत यांनी तर सरकारी पक्षातर्फे ॲड. सुरेश लगड यांनी बाजू मांडली.