शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

मानवी साखळी करून हिंसक जमावाला रोखले, मुस्लिम तरुणांनी मंदिर वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 13:38 IST

सोशल मीडियावर संबंधित आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यानंतर जमावाने स्थानिक काँग्रेस आमदाराच्या घरावर हल्ला केला होता. यादरम्यान,हिंसक जमावाने पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या मंदिराच्या दिशेने चाल केली होती.

ठळक मुद्दे बंगळुरूमधील पुलकेशीनगर परिसरात मंगळवारी रात्री सोशल मीडियावरील एका पोस्टवरून जमाव भडकला होताजमावाने आक्रमक होत काँग्रेस आमदाराच्या निवासस्थानावर हल्ला करून मोडतोड केलीजमावाने डीजे हल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मंदिराच्या दिशेने चाल केलीजागरुक असलेल्या काही मुस्लिम तरुणांनी जमावाला मानवी साखळी करून मंदिराजवळ जाण्यापासून रोखले.

बंगळुरू - सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे काल रात्री बंगळुरूमध्ये दंगल उसळली होती. या दंगतील हिंसक जमाव आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर संबंधित आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यानंतर जमावाने स्थानिक काँग्रेस आमदाराच्या घरावर हल्ला केला होता. यादरम्यान,हिंसक जमावाने पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या मंदिराच्या दिशेने चाल केली होती. मात्र काही मुस्लिम तरुणांनी मंदिराच्या आवारात मानवी साखळी करून हिंसक जमावापासून मंदिराचे रक्षण केले.या घटनेचा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. बंगळुरूमधील पुलकेशीनगर परिसरात मंगळवारी रात्री सोशल मीडियावरील एका पोस्टवरून जमाव भडकला होता. त्यांनी आक्रमक होत काँग्रेस आमदाराच्या निवासस्थानावर हल्ला करून मोडतोड केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित आमदाराच्या निवास्थानाजवळ मोठ्या संख्येने जमाव जमला होता, त्यांनी मोडतोड केली. हल्लेखोरांनी डीजे हल्ली आणि केजी हल्ली पोलीस ठाणे परिसरातही जोरदार आंदोलन केले. याचदरम्यान, जमावाने डीजे हल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मंदिराच्या दिशेने चाल केली. मात्र जागरुक असलेल्या काही मुस्लिम तरुणांनी आक्रमक होत असलेल्या जमावाला मानवी साखळी करून मंदिराजवळ जाण्यापासून रोखले.

कर्नाटकची राजधानी बंगळुरूत सोशल मीडियावरील एका  पोस्टवरून काल रात्री हिंसाचार झाला. यावेळी काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्तींच्या घरावर जमावाने हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवरदेखील जमावाने हल्ला केला. यामध्ये 60 पोलीस कर्मचारी जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आता तब्बल 110 जणांना अटक केल्याची माहिती मिळत आहे. बंगळुरू शहराचे पोलीस सहआयुक्त संदीप पाटील यांनी याबाबत माहिती  दिली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बंगळुरूत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. याशिवाय डी. जे. हल्ली आणि के. जे. हल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला आहे. काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्तींच्या भाच्याच्या सोशल मीडियावरील पोस्टने बंगळुरूत वादंग माजला आहे. नवीन असं वादग्रस्त पोस्ट शेअर करणाऱ्या आरोपीचं नाव असून त्याला देखील अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.   

इतर महत्त्वाच्या बातम्या

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

टॅग्स :Karnatakकर्नाटकBengaluruबेंगळूरMuslimमुस्लीमHinduहिंदू