शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम असल्याची बतावणी करत केला मैत्रिणीवर बलात्कार, व्हिडीओ काढून पॉर्न वेबसाईटवर केला अपलोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 11:16 IST

आपल्या कंपनीतील महिला सहकारी कर्मचा-यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली खासगी कंपनीत काम करणा-या एका 28 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक करण्यात आली आहे

ठळक मुद्देकंपनीतील महिला सहकारी कर्मचा-यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली खासगी कंपनीत काम करणा-या एका 28 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक बलात्कार केल्यानंतर आपल्या मोबाईलवर व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं होतंव्हिडीओ पॉर्न वेबसाईटवर अपलोड करण्याची धमकी देत पीडित तरुणीला केलं ब्लॅकमेल तरुणीने मागण्या पुर्ण करण्यास नकार दिल्यानंतर आरोपी अरिंदम नाथने व्हिडीओ पॉर्न वेबसाईटवर अपलोड केला होता

बंगळुरु, दि. 12 - आपल्या कंपनीतील महिला सहकारी कर्मचा-यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली खासगी कंपनीत काम करणा-या एका 28 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक करण्यात आली आहे. आरोपीने बलात्कार केल्यानंतर आपल्या मोबाईलवर व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं होतं. व्हिडीओ पॉर्न वेबसाईटवर अपलोड करण्याची धमकी देत त्याने पीडित तरुणीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. तरुणीने मागण्या पुर्ण करण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने व्हिडीओ पॉर्न वेबसाईटवर अपलोड केला होता. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. 

आरोपीचं नाव अरिंदम नाथ असून पश्चिम बंगालमधील एजिपुरा परिसरातील निवासी आहे. शुक्रवारी त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

'26 वर्षीय पीडित तरुणी बंगळुरुमधील एका खासगी कंपनीत एचआर एक्झिक्यूटिव्ह म्हणून काम करत आहे. तरुणीने केलेल्या तक्रारीच्या आधारे अरिंदम नाथ याला अटक करण्यात आली आहे', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अरिंदम नाथने गतवर्षी पीडित तरुणीला एजिपुरा येथील आपल्या फ्लॅटवर बोलावलं होतं. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. इतकंच नाही तर बलात्कार करत असताना त्याने मोबाईल फोनवर व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं. या व्हिडीओच्या माध्यमातून अरिंदम नाथने तरुणीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केलं. मी सांगेन तेव्हा फ्लॅटवर आली नाहीस तर हा व्हिडीओ पॉर्न वेबसाईटवर अपलोड करेन अशी धमकीच त्याने तरुणीला दिली होती. तरुणीने त्याची मागणी मान्य केली. यानंतर अनेकदा माझ्यावर बलात्कार झाला अशी माहिती तरुणीने तक्रारीत दिली आहे. यानंतर त्याने पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली होती.

'त्याने 4 सप्टेंबर रोजी व्हिडीओ पॉर्न वेबसाईटवर अपलोड केल्यानंतर मी त्याच्या मागण्यांना उत्तर देणं बंद केलं', अशी माहिती तरुणीने दिली आहे. तरुणी ओडिशा येथील असून 2015 पासून बंगळुरुत राहत आहे. तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, अरिंदमने आपलं प्रेम असल्याची कबुली दिली असल्याने, सुरुवातीला त्याचा मागण्या पुर्ण केल्या होत्या.

6 सप्टेंबर रोजी अरिंदम नाथविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आपण व्हिडीओ पॉर्न वेबसाईटवर अपलोड केल्याची त्याने कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी कलम 376, 384, 506 आणि 66E अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

या घटनेचा तरुणीला प्रचंड मानसिक धक्का बसला असून तिने गळफास लावून आत्महत्येचाही प्रयत्न केला. मैत्रिणीने वेळीच दरवाजा उघडल्याने तिला वाचवता. यानंतर मैत्रिणींच्या सांगण्यावरुनच पीडित तरुणीने पोलीस तक्रार दाखल केली. 

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हाPoliceपोलिस