शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

राष्ट्रपतींच्या गाड्यांनाही आता लागेल नंबर प्लेट! मोटार वाहन कायद्याची समान अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 1:45 AM

राष्ट्रपती व उपराष्ट्रपती, तसेच राज्यांचे राज्यपाल आणि उपराज्यपाल या देशातील सर्वोच्च घटनात्मक पदांवरील व्यक्तींप्रमाणेच परदेशी राष्ट्रप्रमुखांच्या भारत भेटीच्या वेळी वापरल्या जाणाºया मोटारींचीेही ‘आरटीओ’कडे नोंदणी करून, या मोटारींवर ‘नंबर प्लेट’ लावली जाणार आहे.

नवी दिल्ली - राष्ट्रपती व उपराष्ट्रपती, तसेच राज्यांचे राज्यपाल आणि उपराज्यपाल या देशातील सर्वोच्च घटनात्मक पदांवरील व्यक्तींप्रमाणेच परदेशी राष्ट्रप्रमुखांच्या भारत भेटीच्या वेळी वापरल्या जाणाºया मोटारींचीेही ‘आरटीओ’कडे नोंदणी करून, या मोटारींवर ‘नंबर प्लेट’ लावली जाणार आहे. यामुळे शासक आणि जनता असा भेदभाव न राहता मोटार वाहन कायद्याची सर्वांसाठी समान अंमलबजावणी होईल.रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिल्ली उच्च न्यायालयात एका जनहित याचिकेच्या सुनावणीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार मंत्रालयाने २ जानेवारी रोजी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि नायब राज्यपाल यांच्या कार्यालयांना तसेच परराष्ट्र मंत्रालयास पत्र लिहून कळविले आहे की, त्यांनी या अतिविशिष्ठ व्यक्तींसाठी वापरल्या जाणाºया मोटारींची ‘आरटीओ’कडे नोंदणी केली नसेल तर ती करून घ्यावी व त्यानुसार ‘नंबर प्लेट’ मोटारींवर लावाव्या.मंत्रालयाने न्यायालयास असेही सांगितले की, या पत्रानंतर उपराष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नी वापरत असलेल्या आमच्याकडील सर्व मोटारींची आम्ही नोंदणी केली असून त्या मोटारींवर ‘नंबर प्लेट’ लावण्यात आल्या आहेत, असे उपराष्ट्रपतींच्या कार्यालयाने कळविले आहे.त्याचप्रमाणे, परदेशी राष्ट्रप्रमुखांच्या भारत भेटीच्या वेळी वापरल्या जाणाºया १४ मोटारींची नोंदणी करण्याचे काम सुरूआहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने कळविले आहे.स्वातंत्र्यानंतर काही काळ या अतिविशिष्ठ व्यक्तींच्या मोटारींवर अन्य वाहनांप्रमाणेच ‘आरटीओ’च्या नोंदणी क्रमांकाची ‘नंबर प्लेट’ लावली जायची. मात्र कालांतराने ‘नंबर प्लेट’ ऐवजी त्या जागी फक्त सिंहांची ४ तोंडे असलेले भारताचे सोनेरी राजचिन्ह लावण्याची प्रथा सुरू केली गेली.‘न्यायभूमी’ या स्वयंसेवी संस्थेने याविरुद्ध जनहित याचिका केली आहे. अशा मोटारींवर ‘नंबर प्लेट’ न लावणे हे मोटार वाहन कायद्याचे उघड उल्लंघन आहे. कारण कायद्यात अशा मोेटारींना नोंदणी न करण्याची व ‘नंबर प्लेट’ न लावण्याची कोणतीही सूट दिलेली नाही. शिवाय यावरून या पदांवरील व्यक्ती या लोकसेवक नव्हे, तर शासक असल्याची भावना यातून दिसून येते, तसेच राजचिन्ह लावल्याने अशा मोटारी दहशतवाद्यांचे सहज लक्ष्य ठरू शकतात.याचिका म्हणते की, अशा मोटारींमुळे होणाºया अपघातात मृत वा जखमी होणाºयांना भरपाईसाठी कोणताही दावा दाखल करता येत नाही. कारण अपघातग्रस्त मोटारीच्या मालकाची वा नोंदणीची त्याला काहीच माहिती मिळत नाही. यातून वरिष्ठ सत्तापदांवर बसलेले उघडपणे कायदा मोडतात तर आपणही तो मोडावा, ही वृत्ती बळावते.राष्ट्रपतींच्या जिवाला धोकायाचिकाकर्त्यांनी ‘आरटीआय’ अन्वये माहिती मागितली असता, परराषट्र मंत्रालयाने त्यांच्याकडील ‘प्रोटोकॉल विभागा’त वापरल्या जाणाºया १४ पैकी एकाही मोटारीची नोंदणी केलेली नसल्याचे सांगितले. राष्ट्रपती भवनाने मात्र त्यांच्या मोटारींची नोंदणी केलेली आहे की नाही हे न कळविता, या मोटारींचे रजिस्ट्रेशन नंबर उघड केल्याने देशाची सुरक्षा धोक्यात येईल आणि व्यक्तिश: राष्ट्रपतींच्या जिवाला धोका संभवेल, असे उत्तर दिले.

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षIndiaभारत