शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

Presidential Election: मुख्यमंत्री KCR तिसरी आघाडी काढण्याच्या तयारीत, विरोधी नेत्यांसोबत बैठका सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 4:55 PM

KCR Meetings: जुलैमध्ये होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव तिसरी आघाडी काढण्याची तयारी करत आहेत.

TRS President KCR:  तेलंगणा राष्ट्र समितीचे (TRS) अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) सध्या भारतात तिसरी आघाडी तयार करण्याच्या तयारीत आहेत. याबाबत त्यांनी बैठकही घेतली असून अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी त्यांना ही आघाडी उभी करायची आहे. या तिसऱ्या आघाडीतून ते राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवाराला कडवं आव्हान देण्याचा प्रयत्न करतील.

इंग्रजी वृत्तपत्र इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, केसीआर सतत विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटत आहेत आणि ते एनडीएचे सहयोगी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनाही या आघाडीत सामील करण्याचा प्रयत्न करत आहेत.

केसीआर यांनी काल अनेक विरोधी नेत्यांची बैठक घेतली. यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेदेखील होते. तसेच, त्यांनी दिल्लीतील शाळा आणि मोहल्ला क्लिनिकला भेट दिली. त्यांनी समाजवादी पक्षाचे नेते आणि यूपी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांचीही भेट घेतली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत बिगर-काँग्रेस आणि बिगर भाजप उमेदवार उभे करण्याचा केसीआर विचार करत आहेत.

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचीही भेट घेणार केसीआर 26 मे रोजी बंगळुरू येथे जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचीही भेट घेणार आहेत. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत केसीआर यांनी देवेगौडा यांना बिगर भाजप आघाडीसाठी पाठिंबा दिला होता. अलीकडेच देवेगौडा यांनी केसीआर यांचे भाजप आणि सांप्रदायिक शक्तींविरुद्धच्या लढ्याबद्दल अभिनंदन केले. 

केसीआर या महिन्यात अनेक नेत्यांना भेटणार आहेत26 मे रोजी देवेगौडा यांची भेट घेतल्यानंतर केसीआर 28 मे रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेणार आहेत. भाजपच्या विचारसरणीशी संबंधित नसलेल्या सर्व नेत्यांना राव भेटत आहेत. 2019 च्या निवडणुकीच्या एक वर्ष आधी मार्च 2018 मध्ये त्यांनी कोलकाता येथे फेडरल फ्रंट उघडण्याच्या कल्पनेवर एकमेकांना पाठिंबा दिला होता. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाBJPभाजपा