Presidential Election: मुख्यमंत्री KCR तिसरी आघाडी काढण्याच्या तयारीत, विरोधी नेत्यांसोबत बैठका सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 04:55 PM2022-05-22T16:55:39+5:302022-05-22T16:55:45+5:30

KCR Meetings: जुलैमध्ये होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव तिसरी आघाडी काढण्याची तयारी करत आहेत.

Presidential Election: Chief Minister KCR prepares to form a third front, meetings with opposition leaders begin | Presidential Election: मुख्यमंत्री KCR तिसरी आघाडी काढण्याच्या तयारीत, विरोधी नेत्यांसोबत बैठका सुरू

Presidential Election: मुख्यमंत्री KCR तिसरी आघाडी काढण्याच्या तयारीत, विरोधी नेत्यांसोबत बैठका सुरू

Next

TRS President KCR:  तेलंगणा राष्ट्र समितीचे (TRS) अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) सध्या भारतात तिसरी आघाडी तयार करण्याच्या तयारीत आहेत. याबाबत त्यांनी बैठकही घेतली असून अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी त्यांना ही आघाडी उभी करायची आहे. या तिसऱ्या आघाडीतून ते राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवाराला कडवं आव्हान देण्याचा प्रयत्न करतील.

इंग्रजी वृत्तपत्र इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, केसीआर सतत विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटत आहेत आणि ते एनडीएचे सहयोगी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनाही या आघाडीत सामील करण्याचा प्रयत्न करत आहेत.

केसीआर यांनी काल अनेक विरोधी नेत्यांची बैठक घेतली. यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेदेखील होते. तसेच, त्यांनी दिल्लीतील शाळा आणि मोहल्ला क्लिनिकला भेट दिली. त्यांनी समाजवादी पक्षाचे नेते आणि यूपी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांचीही भेट घेतली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत बिगर-काँग्रेस आणि बिगर भाजप उमेदवार उभे करण्याचा केसीआर विचार करत आहेत.

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचीही भेट घेणार 
केसीआर 26 मे रोजी बंगळुरू येथे जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचीही भेट घेणार आहेत. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत केसीआर यांनी देवेगौडा यांना बिगर भाजप आघाडीसाठी पाठिंबा दिला होता. अलीकडेच देवेगौडा यांनी केसीआर यांचे भाजप आणि सांप्रदायिक शक्तींविरुद्धच्या लढ्याबद्दल अभिनंदन केले. 

केसीआर या महिन्यात अनेक नेत्यांना भेटणार आहेत
26 मे रोजी देवेगौडा यांची भेट घेतल्यानंतर केसीआर 28 मे रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेणार आहेत. भाजपच्या विचारसरणीशी संबंधित नसलेल्या सर्व नेत्यांना राव भेटत आहेत. 2019 च्या निवडणुकीच्या एक वर्ष आधी मार्च 2018 मध्ये त्यांनी कोलकाता येथे फेडरल फ्रंट उघडण्याच्या कल्पनेवर एकमेकांना पाठिंबा दिला होता.
 

Web Title: Presidential Election: Chief Minister KCR prepares to form a third front, meetings with opposition leaders begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.