शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अरुण जेटलींची प्रकृती गंभीर; राष्ट्रपतींनी एम्समध्ये घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 14:50 IST

९ ऑगस्टपासून जेटलींवर उपचार सुरू

नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी थोड्याच वेळापूर्वी माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अरुण जेटलींची एम्स रुग्णालयात भेट घेतली. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि राज्यमंत्री अश्विनी चौबेदेखील रुग्णालयात उपस्थित होते. जेटलींवर ९ ऑगस्टपासून एम्सच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण जेटलींची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांचं एक पथक सतत त्यांच्या सेवेत आहे. ९ ऑगस्टला एम्स रुग्णालयानं जेटलींच्या प्रकृतीची माहिती दिली होती. मात्र त्यानंतर रुग्णालयाकडून कोणतंही मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलेलं नाही. श्वासोच्छवासात अडचणी येत असल्यानं जेटलींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या शनिवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी जेटलींची भेट घेतली होती. या वर्षाच्या मे महिन्यातही जेटलींना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. पेशानं वकील असलेल्या जेटलींनी मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात केंद्रीय मंत्री म्हणून काम केलं आहे. त्यांनी अर्थ आणि संरक्षण मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली. यानंतर प्रकृतीच्या कारणांमुळे त्यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. एप्रिल २०१८ मध्येही जेटली प्रकृतीच्या कारणामुळे त्रस्त होते. त्यांनी काही दिवस कार्यालयात जाणंदेखील बंद केलं होतं. त्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं. किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती सुधारली. त्यानंतर त्यांनी पुन्हा कामकाजाला सुरुवात केली. गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा जेटलींना त्रास होऊ लागला. लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या विजयानंतर पक्ष कार्यालयात मोठा जल्लोष झाला. त्यावेळीही जेटली अनुपस्थित होते.  

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीRamnath Kovindरामनाथ कोविंद