निमगाव वाकडा सोसायटी अध्यक्षपदी होळकर

By Admin | Updated: February 8, 2015 00:19 IST2015-02-08T00:19:25+5:302015-02-08T00:19:25+5:30

लासलगाव : निमगाव वाकडा (ता.निफाड) येथील रेणुका माता विविध कार्य. सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी जयदत्त सिताराम होळकर यांची तर उपाध्यक्षपदी रंगनाथ निवृत्ती गायकर यांची बिनविरोध निवड झाली.

President of Nimgaon Waghada Society | निमगाव वाकडा सोसायटी अध्यक्षपदी होळकर

निमगाव वाकडा सोसायटी अध्यक्षपदी होळकर

सलगाव : निमगाव वाकडा (ता.निफाड) येथील रेणुका माता विविध कार्य. सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी जयदत्त सिताराम होळकर यांची तर उपाध्यक्षपदी रंगनाथ निवृत्ती गायकर यांची बिनविरोध निवड झाली.
संस्थेच्या सदस्य मंडळाची निवडणूक मंगळवारी बिनविरोध पार पडली. पदाधिकारी निवडीसाठी निफाड दुय्यम सहाय्यक निबंधक कार्यालयाचे अधिकारी श्री काकड यांच्या उपस्थितीत सदस्य मंडळाची बैठक बोलविण्यात आली त्यात दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने निवड बिनविरोध जाहिर करण्यात आली. बैठकीस संस्थेचे नवनिर्वाचित सदस्य श्रीमती कुसूम होळकर, प्रतिभा होळकर, मधुकर गायकर, निवृतती गायकर, शरद पुरकर, ज्ञानेश्वर गायकर, सुधाकर ठेंगे, शोभा गायकर, पुजा दरेकर, साधना दरेकर, सचिव दिनकर होळकर उपस्थित होते. (वार्ताहर)
-----

Web Title: President of Nimgaon Waghada Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.