शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

President Election: शरद पवारांनी ऑफर नाकारल्यानंतर आता गांधींचे नातू बनणार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 14:21 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १५ जून रोजी दिल्लीत बैठकीचं आयोजन करत देशातील प्रमुख २२ नेत्यांना निमंत्रण पाठवलं होते.

नवी दिल्ली - देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी येत्या १८ जुलैला निवडणूक होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधीपक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार कोण असणार? यावर अद्याप स्पष्टता नाही. मात्र विरोधी पक्षाच्या संयुक्त बैठकीत त्यावर निर्णय होईल. परंतु तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी एकतर्फी अशी बैठक बोलावल्याने कम्युनिट पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. तर आप, टीआरएस या बैठकीत सहभागी होणार नाही. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १५ जून रोजी दिल्लीत बैठकीचं आयोजन करत देशातील प्रमुख २२ नेत्यांना निमंत्रण पाठवलं होते. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. मात्र येंचुरी यांनी पत्र लिहून बैठक बोलावण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला. नेहमीप्रमाणे विरोधी पक्षांमध्ये चर्चा होऊन अशाप्रकारे बैठकीचं आयोजन केले जाते. जेणेकरून या बैठकीला जास्तीत जास्त पक्षांना सहभागी होता येईल. परंतु यंदा तारीख, वेळ, स्थळ आणि अजेंडा माहिती देणारं एकतर्फी पत्र मिळालं. या पत्रात आणि बैठकीत केवळ ३ दिवसांचे अंतर होते. जर योग्य प्रकारे चर्चा करून बैठकीचं आयोजन केले असते तर कदाचित जास्त प्रतिसाद मिळाला असता अशी नाराजी सीताराम येंचुरी यांनी व्यक्त केली आहे. 

राष्ट्रपती निवडणूक लढवणार नाही - पवारममता बॅनर्जी यांनी आणि डाव्या विचारसरणीच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदासाठी संयुक्त उमेदवार म्हणून उभे राहण्याची विनंती केली. परंतु शरद पवारांनी(Sharad Pawar) विरोधकांची ही ऑफर नाकारली. सीताराम येंचुरी म्हणाले की, पवार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उभे राहणार नाही अन्य नावाचा विचार केला जाऊ शकतो. विरोधी पक्षाच्या सूत्रांनुसार, शरद पवार अशा निवडणुकीत उभे राहण्यास इच्छुक नाहीत ज्यात त्यांच्या राजकीय जीवनात पराभव सहन करावा लागू शकतो. 

गोपाळकृष्ण गांधी विरोधी पक्षाचे उमेदवार?राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांनी ऑफर नाकारल्यानंतर आता विरोधकांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी(Gopalkrishna Gandhi) यांच्याशी संपर्क साधला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गांधी २०१७ मध्ये उपराष्ट्रपतीपदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार होते. परंतु व्यैकया नायडू यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. काही विरोधी पक्षातील नेत्यांनी गोपाळकृष्ण गांधी यांना राष्ट्रपती निवडणुकीत संयुक्त उमेदवार म्हणून उभे राहण्याची विनंती करत विचार करण्याचा आग्रह केला आहे. 

कोण आहेत गोपाळकृष्ण गांधी?विरोधी पक्षांकडून अन्य नावांचाही विचार केला जात आहे. गोपाळकृष्ण गांधी हे २००४ ते २००९ या काळात पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. गोपाळकृष्ण गांधी यांचा जन्म २२ एप्रिल १९४५ रोजी महात्मा गांधी यांचे छोटे चिरंजीव देवदास गांधी यांच्या घरी झाला. १९६८ ते १९९२ पर्यंत गोपाळकृष्ण गांधी आयएएस अधिकारी होते. १९९२ मध्ये त्यांनी स्वच्छेने निवृत्ती घेतली. १९८५ ते १९८७ काळात हे उपराष्ट्रपती कार्यालयात सचिव होते. 

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षSharad Pawarशरद पवारMamata Banerjeeममता बॅनर्जी