आठ दिवसांत पुरवणी टंचाई आराखडे सादर करा

By Admin | Updated: December 31, 2014 18:58 IST2014-12-31T00:05:54+5:302014-12-31T18:58:40+5:30

उन्हाळ्यात निर्माण होणारी संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेवून गटविकास अधिकारी यांनी प्रभाग समित्यांच्या सभा घेवून पुरवणी टंचाई आरखडे आणि देखभाल दुरूस्तीचे अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी दिले. येत्या ७ जानेवारीपर्यंत हे आराखडे जिल्हा परिषदेकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Present supplementary scarcity plans in eight days | आठ दिवसांत पुरवणी टंचाई आराखडे सादर करा

आठ दिवसांत पुरवणी टंचाई आराखडे सादर करा

अहमदनगर : उन्हाळ्यात निर्माण होणारी संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेवून गटविकास अधिकारी यांनी प्रभाग समित्यांच्या सभा घेवून पुरवणी टंचाई आरखडे आणि देखभाल दुरूस्तीचे अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी दिले. येत्या ७ जानेवारीपर्यंत हे आराखडे जिल्हा परिषदेकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अध्यक्ष गुंड यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांचा आढावा घेतला. यात जानेवारी ते जून २०१५ या काळात जिल्ह्यात निर्माण होणार्‍या संभाव्य पाणी टंचाई बाबत चर्चा केली. तसेच यावर मात करण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी प्रत्येक जिल्हा परिषद गटात प्रभाग समितीची बैठक घेण्याच्या सूचना दिल्या. यात संबंधित ठिकाणी असणार्‍या सदस्यांच्या सूचना विचारात घेवून पुरवणी टंचाई आराखडा आणि देखभाल दुरूस्तीचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या.
जिल्ह्यात कालबाह्य आणि धोकादायक झालेल्या झालेल्या गणोरे (अकोले), जवळा, तेलंगशी (जामखेड), कर्जत, राशीन (कर्जत), धामोरी कोरेगाव, भांडेवाडी, वारी (कोपरगाव), नेप्ती, भोरवाडी, दरेवाडी, खडकी (नगर) खरवंडी, खुपटी (नेवासा), ढवळपूरी, पोखरी (पारनेर), भालगाव, जांभळी (पाथर्डी), गुंजाळवाडी, घारगाव, आश्वी, तिगाव (संगमनेर), खानापूर, शेवगाव (शेवगाव), बेलापूर (श्रीरामपूर), घोगरगाव, तांदळी, बेलवंडी, लिंपणगाव, आढळगाव, आढळगाव (श्रीगोंदा) येथील पाण्याच्या टाक्यांचा आढावा घेण्यात आला. या टाक्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यानुसार टाक्याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
प्रादेशिक नळ पाणी योजनांच्या गावात पाण्याच्या टाकीला मीटर बसविण्याबाबत चर्चा झाली. मांदळी (कर्जत) व निंबळक (नगर)येथे नळ जोडनिहाय मीटर बसविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. ही प्रक्रिया संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. मुठेवाडगाव (श्रीरामपूर) राबविण्यात आलेली भुयारी गटार योजना जिल्ह्यात राबविण्यासंदर्भात गु्रप ग्रामपंचायतींना सांगण्यात येणार आहे. यावेळी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती बाबासाहेब दिघे, शरद नवले, नंदा वारे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत महाजन, कार्यकारी अभियंता एस.एम. कदम आदी उपस्थित होते.
.....................

Web Title: Present supplementary scarcity plans in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.