POKमध्ये पुन्हा सर्जिकल स्ट्राईकची तयारी! मोदी सरकार घुसखोरीवर कारवाई करणार, पाकिस्तानला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 22:36 IST2023-09-18T22:35:28+5:302023-09-18T22:36:31+5:30
जम्मू-काश्मीरमधील सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीबाबत केंद्र कठोर भूमिका घेऊ शकते.

POKमध्ये पुन्हा सर्जिकल स्ट्राईकची तयारी! मोदी सरकार घुसखोरीवर कारवाई करणार, पाकिस्तानला इशारा
जम्मू-काश्मीरमधील सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीबाबत केंद्र कठोर भूमिका घेऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने घुसखोरीची वृत्ती थांबवली नाही, तर भारत सरकारसमोर कारवाईसाठी सर्व पर्याय खुले आहेत.
केंद्राचा मोठा निर्णय! दहशतवाद्यांना संपविण्यासाठी कुपवाडात सीआरपीएफचे कोब्रा कमांडो तैनात
भारतीय सीमेत घुसखोरी पाकिस्तानी लष्कराच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकत नाही कारण ही सर्व क्षेत्रे त्यांच्याद्वारे चालविली जातात आणि नियंत्रित केली जातात. अतिप्रशिक्षित दहशतवाद्यांना, जे घात हल्ले करण्यात माहिर आहेत, त्यांना पाकिस्तानी लष्कराच्या सपोर्ट फायरने जंगलात पाठवले जाते.
एका अधिकाऱ्याने दिलेली माहिती अशी, आमच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी, “पाकिस्तानची अर्थव्यवस्था खूपच खराब आहे आणि त्यांच्या अंतर्गत मंत्रालयाला नियंत्रण रेषेच्या देखभालीसाठी संरक्षण मंत्रालयाला प्रचंड शुल्क द्यावे लागते जे आजकाल काहीच नाही.
आमच्याकडे दुसरा पर्याय आहे. याद्वारे आम्ही घुसखोर जिथे बसले आहेत तिथे त्यांच्या लाँचिंग कॅम्पवर हल्ला करणे आणि आमच्या सीमा वाचवण्यासाठी त्यांच्या भागात घुसखोरी करणे.
कुपवाडात सीआरपीएफचे कोब्रा कमांडो तैनात
दोन दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ल्यात तीन महत्वाचे अधिकारी शहीद झाले होते. यानंतर जंगलात अड्डे बनविलेल्या दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भारतीय सैन्य आणि जम्मू पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. यातच दहशतवाद्यांनी जंगलांना अड्डे बनविल्याने आता कोब्रा कमांडोंनाच उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोब्रा कमांडोंच्या पहिल्या बॅचने नुकतेच जम्मूच्या जंगलात प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या कमांडोंना कुपवाडामध्ये तैनात करण्यात आले आहे.
२००९ मध्ये कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट अॅक्शन (CoBRA) ची माओवादी बंडखोरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी स्थापना करण्यात आली होती. आता त्यांना पहिल्यांदाच मध्य आणि पूर्व भारतातून काढून जम्मू-काश्मीरला पाठवण्यात आले आहे.