शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कर्नाटकात ऑपरेशन कमळची तयारी, आमदरांच्या खरेदीसाठी 100 कोटींची ऑफर; काँग्रेसचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 17:36 IST

"रविकुमार गौडा म्हणाले, 'मी आजही म्हणत आहे की, त्यांनी (भाजप) आता 50 कोटी रुपयांची ऑफर वाढवून 100 कोटी रुपये केली आहे. परवा कोणी फोन करून..."

कर्नाटकातील मांड्या येथील काँग्रेस आमदार रविकुमार गौडा यांनी रविवारी विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर 'ऑपरेशन लोटस'च्या तयारीचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकार अस्थिर करण्यासाठी 100 कोटी रुपयांची ऑफर देऊन काँग्रेस आमदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, एकही आमदार त्याच्या झाळ्यात अडकणार नाही. राज्यातील काँग्रेसचे सरकार स्थिर आणि मजबूत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

रविकुमार गौडा म्हणाले, 'मी आजही म्हणत आहे की, त्यांनी (भाजप) आता 50 कोटी रुपयांची ऑफर वाढवून 100 कोटी रुपये केली आहे. परवा कोणी फोन करून 100 कोटी रुपये तयार असल्याचे सांगितले होते. त्यांना 50 आमदार खरेदी करायचे आहेत. भाजपचे लोक 50 कोटींवरून 100 कोटींवर पोहोचले आहेत. ते म्हणाले, मला कुणीतरी फोन केला होता, मी त्याला म्हणालो 100 कोटी रुपये आपल्याकडेच ठेवा. मी ईडीकडे तक्रार करण्याचा विचार केला. ते सातत्याने आमचे सरकार पाडण्याच्या तयारीत आहेत. मात्र आमचे सरकार स्थिर असून मुख्यमंत्रीही मजबूत आहेत.

"4 आमदारांसोबत साधला गेला संपर्क" -यापूर्वी, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातही गौडा यांनी असाच दावा केला होता. एका चमूने काँग्रेस आमदारांना 50 कोटी रुपये आणि मंत्रिपदाचे आमिष दाखवून आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. 4 आमदारांसोबत संपर्क साधण्यात आला होता. याचे पुरावे आहेत, असा दावा त्यांनी केला होता. गौडा यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बीएल संतोष, केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे, प्रल्हाद जोशी आणि एचडी कुमारस्वामी (जनता दल-सेक्युलर) यांच्यावर आरोप केले होते.

गौडा म्हणाले, राज्यातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्यासाठी हे लोक एका टोळीच्या स्वरुपात काम करत आहेत. मात्र, 136 आमदार असलेले काँग्रेस सरकार मजबूत आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री गरिबांचे हितचिंतक असून त्यांना कोणीही हटवू शकत नाही.

टॅग्स :Karnatakकर्नाटकBJPभाजपाcongressकाँग्रेस