शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

‘मन की बात’च्या १०० व्या भागानिमित्त जल्लोषाची तयारी, शंभर रुपयांचे नाणे जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 10:10 IST

केंद्रीय मंत्री अमित शाह करणार १०० रुपयांचे नाणे जारी

संजय शर्मानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेडिओवर होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे १०० भाग पूर्ण होत असून, यानिमित्त क्रीडा, चित्रपट, पर्यावरण, जल संरक्षण, महिला उत्थानाशी संबंधित विविध क्षेत्रांतील मान्यवर भव्य समारंभात सहभागी होऊन ‘मन की बात’चा देशावर किती परिणाम झाला आहे, हे सांगणार आहेत. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १०० भाग पूर्ण झाल्यानिमित्ताने १०० रुपयांचे विशेष नाणेही जारी करणार आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यानिमित्त विशेष टपाल तिकीट जारी करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ डिसेंबर २०१४ रोजी रेडिओवर सुरू केलेल्या ‘मन की बात’चे १०० भाग ३० एप्रिल रोजी पूर्ण होत आहेत. यानिमित्त दिल्लीच्या नॅशनल मीडिया सेंटरमध्ये केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने ‘मन की बात’वर एक कॉन्क्लेव्ह आयोजित केली आहे. त्याचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड करणार आहेत. महिला शक्ती, वारसा बचाव, जलसंवाद व आवास ते जनआंदोलन, आदी विषयांवर चार सत्रांमध्ये तज्ज्ञांशी खुली चर्चा होणार आहे. या वेळी ‘मन की बात’वर एक कॉफीटेबल बुकचे प्रकाशन अमित शाह यांच्या हस्ते होईल.

 एक लाख ठिकाणी कार्यक्रम

या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय मंत्री अमित शाह, अनुराग ठाकूर यांच्याबरोबरच चित्रपट क्षेत्रातून आमिर खान, रविना टंडन उपस्थित राहणार आहेत.

देशाच्या विविध भागांतून १०७ जणांना या कार्यक्रमात बोलावण्यात आले आहे. त्यांच्या नावांचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे १०० भाग पूर्ण होत असल्याबद्दल देशभरात जल्लोष करण्याची तयारी सुरू आहे.

३० एप्रिल रोजी ‘मन की बात’ ऐकण्यासाठी भाजपने देशभरात एक लाख ठिकाणी विशेष आयोजन केले आहे. यात सर्व केंद्रीय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते, सर्व खासदार, आमदार, नेत्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बात