शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
3
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
4
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
5
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
6
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
7
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
9
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
11
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
12
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
13
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
14
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
15
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
16
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
18
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
19
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
20
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!

भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 12:40 IST

अटकेनंतर ATS ने त्याच्या मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसची तपासणी केली, ज्यातून पाकिस्तानशी असलेले संपर्क समोर आले. 

लखनऊ - अलीकडेच एटीएसने सहारनपूर येथून दहशतवादी बिलालला अटक केली. तेव्हापासून त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्या चौकशीतून अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत. बिलाल पाकिस्तानमधील अल कायदाच्या हँडलर्ससह सुमारे ४,००० नंबरशी संपर्कात होता असे समोर आले आहे. पाकिस्तानी हँडलर्स त्याला दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन करण्याबाबत सतत सूचना पाठवत होते. तो सोशल मीडियावर जिहादी प्रचार पसरवत होता. चौकशीनंतर दहशत पसरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक सोशल मीडिया अकाउंट्सची माहिती देखील जमा करण्यात आली आहे. 

सहारनपूरचा रहिवासी बिलाल हा अल-कायदाच्या मदतीने भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होता. त्याला १५ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) अटक केली. ४ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या रिमांड कालावधीत एटीएसने बिलालच्या चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. एटीएस सध्या बिलालच्या मोबाईल डेटाची पडताळणी करत आहे. बिलालने सरकार अस्थिर करण्यापासून शरिया कायदा लागू करण्याबद्दल बोलल्याचेही समोर आले आहे. शिवाय, त्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा उल्लेख "शहीद" असा केला.

बिलालने त्याच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये पहिला AQIS प्रमुख असीम उमर याला श्रद्धांजली वाहिली. त्याने असीम उमरला त्याच्या ग्रुप सदस्यांसाठी हिरो म्हणून वर्णन केले. जर तुम्ही जिहादचा मार्ग अवलंबला तर मोरोक्कोपासून फिलीपिन्सपर्यंत मुजाहिदीन तुमच्या समर्थनात उभे राहतील. जिथे मुजाहिदीन घाम गाळतील तिथे लोक रक्त सांडतील असं तो युवकांना भडकावत होता. उत्तर प्रदेश अँटी-टेररिस्ट स्क्वॉड (ATS) ने १५ सप्टेंबर २०२५ रोजी सहारनपूर येथून बिलाल खानला अटक केली. ही अटक AQIS च्या भारतातील दहशतवादी नेटवर्कशी संबंधित मोहिमेचा भाग होती. अटकेनंतर ATS ने त्याच्या मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसची तपासणी केली, ज्यातून पाकिस्तानशी असलेले संपर्क समोर आले. 

बिलालच्या फोनमधून ४,००० हून अधिक पाकिस्तानी नंबरांशी संपर्क सापडला. यापैकी अनेक नंबर AQIS च्या पाकिस्तानातील हँडलर्सचे होते, ज्यांच्याशी तो नियमित बोलत असे. पाकिस्तानातील हँडलर्सच्या सूचनेनुसार भारतात हिंसक जिहादची मोहिम राबवण्याची तयारी. यात सोशल मीडियाद्वारे भरती घेणे, उत्तर प्रदेशात दहशतवादी प्रशिक्षण देणे आणि भारतविरोधी हल्ल्यांची योजना समाविष्ट होती. बिलालने उत्तर प्रदेशात तरुणांना दहशतवादी संघटनेत भरती करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला होता. ATS ने त्याच्या नेटवर्कमधील इतर संशयितांवरही कारवाई सुरू केली आहे. सध्या या प्रकरणात अजून चौकशी सुरू असून आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : India terror plot: Pakistani links exposed in Bilal's interrogation.

Web Summary : ATS arrested Bilal, uncovering a terror plot with Pakistani links. Bilal was in contact with 4,000 numbers, including al-Qaeda handlers, planning attacks and spreading propaganda. He glorified terrorists and recruited youth via social media for violent jihad in India.
टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाAnti Terrorist SquadएटीएसterroristदहशतवादीIndiaभारतPakistanपाकिस्तान