शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

२०२४ची जोरदार तयारी सुरू पण भाजपला १६० जागांची चिंता; महाराष्ट्रात जोर लावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 06:02 IST

पराभूत १६० जागांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. यात अनेक केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ खासदारांनी सहभाग नोंदवला

संजय शर्मा

नवी दिल्ली : २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या १६० जागा आता जिंकण्यासाठी भाजपने या लोकसभा मतदारसंघांमध्ये ज्येष्ठ व दिग्गज नेत्यांना उतरवून जिंकण्याचा मेगा प्लॅन तयार केला आहे. खासदारांना मतदारसंघात प्रवास व रात्रीचा मुक्काम करण्याचेही निर्देश दिले आहेत. २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी भाजपला सर्वांत जास्त चिंता १६० जागांची असून, याच ठिकाणी २०१९मध्ये पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या जागांवर भाजपने आपले दिग्गज नेते, केंद्रीय मंत्री व खासदारांना पाठवून निवडणूक जिंकण्याची जबाबदारी दिली होती.

या जागांसाठी नियुक्त केलेल्या नेत्यांसमवेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या आजवर पाचपेक्षा जास्त बैठका झालेल्या आहेत. आजही या पराभूत १६० जागांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. यात अनेक केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ खासदारांनी सहभाग नोंदवला. या जागांची जबाबदारी घेणाऱ्या नेत्यांनी स्थानिक समीकरण, भाजपचा कमकुवतपणा ही कारणे पक्षनेतृत्वासमोर ठेवली आहेत. या नेत्यांचे म्हणणे आहे की, स्थानिक समीकरण बदलताच तेथे विजय सुनिश्चित होईल. पक्षाचे संघटन अशा काही जागांवर काही राज्यांत कमकुवत आहे. दक्षिणेकडील राज्यांत भाजपचा कमकुवतपणा स्पष्ट दिसत आहे. युती करून तेथील उणिवा दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महाराष्ट्रात जोर लावणारमहाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी २५ जागा भाजपने लढवल्या होत्या. त्यापैकी २३ जागांवर विजय प्राप्त केला होता. राज्यातील पराभूत झालेल्या दोन जागा जिंकण्यासाठी ताकद लावली जात आहे. विशेष म्हणजे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना महाराष्ट्रातील बारामतीची जागा जिंकण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात नवीन समीकरण निर्माण झाल्यानंतर आता कोणताही निर्णय घेताना भाजपला राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाला बरोबर घ्यावे लागणार आहे.

१८ जुलै रोजी एनडीएचे नवे रूप दिसणार१८ जुलै रोजी दिल्लीच्या हॉटेल अशोकामध्ये एनडीएची मोठी आणि महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, यात नवीन मित्रपक्ष सहभागी होतील. यावेळी एनडीएचे नवे रूप समोर येईल. शिवसेनेचे नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार, टीडीपीचे चंद्राबाबू नायडू, अकाली दलाचे सुखबीर बादल, सुभास्पाचे ओमप्रकाश राजभर या बैठकीत सहभागी होऊ शकतात.

कुठे असेल भर?पश्चिम बंगालच्या २४ जागा आहेत. त्या ठिकाणी भाजपचा कमकुवतपणा अद्यापही कायम आहे. आजही पंचायत निवडणुकीत भाजपचा बंगालमध्ये पराभव झाला आहे. मध्य प्रदेशातील एकमेव छिंदवाडा मतदारसंघात भाजपला अनेक वर्षांपासून पराभव पत्करावा लागत आहे. उत्तर प्रदेशच्या १८ जागांची अशीच स्थिती आहे. 

टॅग्स :BJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार