शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

सलाम! हिमवृष्टीत अडकलेल्या गर्भवतीच्या मदतीसाठी धावले लष्कराचे जवान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 2:45 PM

महिलेला स्ट्रेचरवरुन रुग्णालयात केलं दाखल; जुळ्यांना जन्म दिल्यानंतर महिलेनं मानले जवानांचे आभार

श्रीनगर: हिमवृष्टीमुळे रस्त्यात अडकलेल्या गर्भवतीला लष्कराच्या जवानांनी सुखरुपपणे रुग्णालयात दाखल केलं. जवानांनी योग्य वेळी मदत केल्यानं महिला रुग्णालयात पोहोचली. त्यानंतर तिनं जुळ्यांना जन्म दिला. या मदतीबद्दल महिलेनं लष्कराच्या जवानांचे आभार मानले. काश्मीरच्या बांदिपोरात ही घटना घडली.बांदिपोरातल्या लष्करी तळावर एका ग्रामस्थानं शुक्रवारी कॉल केला. प्रचंड हिमवृष्टी सुरू असल्यानं पत्नीला रुग्णालयात नेण्यासाठी मदत करा, असं आवाहन ग्रामस्थानं लष्कराला केलं. त्यानंतर जवान ग्रामस्थाच्या पत्नीच्या मदतीला धावले. त्यावेळी जोरदार हिमवृष्टीमुळे बांदिपोरातील तापमान उणे सात अंश सेल्सिअस होतं. 'बर्फवृष्टीमुळे रस्ते वाहतूक ठप्प होती. मात्र महिलेला काहीही करुन रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं,' अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली. ग्रामस्थाच्या फोन कॉलनंतर लष्करानं सूत्रं हलवली. रस्ते वाहतूक ठप्प असल्यानं बांदिपोरा राष्ट्रीय रायफल्सचे जवान चालत महिलेच्या घराजवळ पोहोचले. त्यांनी महिलेला स्ट्रेचरवर ठेवलं आणि अडीच किलोमीटरचं अंतर पायी कापलं. यावेळी रस्त्यावर जवळपास कमरेइतका बर्फ साचला होता. यानंतर महिलेला लष्कराच्या रुग्णवाहिकेतून बांदिपोरातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. परिस्थिती नाजूक असल्यानं आम्ही प्रशासनाशी संवाद साधला. लष्कर आणि प्रशासनाच्या समन्वयामुळे महिला रुग्णालयात पोहोचेपर्यंत रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध करुन देण्यात आले. तिथे या महिलेनं जुळ्यांना जन्म दिल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.  

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान