गर्भवती महिलेला रजा नाकारली, पदावरून हटविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 05:46 IST2024-10-31T05:45:18+5:302024-10-31T05:46:51+5:30
आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी ओडिशा सरकारने बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याला (सीडीपीओ) बुधवारी पदमुक्त केले.

गर्भवती महिलेला रजा नाकारली, पदावरून हटविले
भुवनेश्वर : ओडिशा सरकारने एका गर्भवती महिलेला रजा देण्यास नकार देणाऱ्या अधिकाऱ्याला पदावरून हटविले आहे. आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी ओडिशा सरकारने बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याला (सीडीपीओ) बुधवारी पदमुक्त केले.
वर्षा प्रियदर्शिनी या महिलेला सीडीपीओ स्नेहलता साहू यांच्याकडून सुट्टी न मिळाल्याने तिच्या न जन्मलेल्या बाळाचा गर्भातच मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी साहू यांना हटविल्याचे उपमुख्यमंत्री प्रभाती परिदा यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)