शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

धमकीचा संदेश आणणाऱ्या कबुतरास ‘अटक’!

By admin | Updated: October 3, 2016 12:10 IST

मोदी यांना उद्देशून लिहिलेला धमकीचा संदेश लिहिलेली चिठ्ठी घेऊन सीमेपलीकडून आलेल्या एका कबुतरास सीमा सुरक्षा दलाने रविवारी ‘अटक’ केली.

पठाणकोट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून लिहिलेला धमकीचा संदेश लिहिलेली चिठ्ठी घेऊन सीमेपलीकडून आलेल्या एका कबुतरास सीमा सुरक्षा दलाने रविवारी ‘अटक’ केली.भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून तेथील दहशतवादी तळ उद््ध्वस्त केल्यानंतर मोदींना उद्देशून लिहिलेले व हवाई मार्गाने पाठविलेले असे संदेश पंजाबच्या सीमावर्ती गावांमध्ये येण्याची ही तिसरी घटना आहे. शनिवारी पोलिसांनी असे संदेश लिहिलेले दोन फुगे जप्त केले होते.सीमेलगतच्या बमिआल सेक्टरमधील सिंबल चौकीजवळ सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना करड्या रंगाचे हे कबुतर मिळाले. त्याच्या पायाला मोदींना उद्देशून लिहिलेला उर्दू संदेश होता. संदेशाचा आशय पाहता हे कबुतर सीमेपलीकडून पाठविण्यात आले असावे, असे दिसते.शनिवारी पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यात दिनानगरजवळ घेसाल गावात मोदी यांना उद्देशून उर्दूमध्ये संदेश लिहिलेले दोन फुगे गावकऱ्यांना मिळाले. ते पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पिवळ्या रंगाचे हे दोन फुगे नेमके कुठून पाठविण्यातआले हे लगेच स्पष्ट झाले नाही. घेसाल गावातील एका रहिवाशास त्याच्या घराजवळ हे फुगे हवेतून येऊन जमिनीवर पडलेले आढळले. त्यावर उर्दूमध्ये संदेश लिहिल्याचे पाहून त्याने ते पोलिसांच्या हवाली केले. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल गुरदासपूर आणि पठाणकोट या सीमेवरील जिल्ह्यांचा दौरा करणार असतानाच हे फुगे सापडल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. जुलैमध्येही दिनानगरजवळच्या झंडे चाक गावात पोलिसांना असाच एक फुगा मिळाला होता. पठाणकोट आणि दिनानगर या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे लष्करी तळावर व पोलीस ठाण्यावर पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्याच परिसरात असे फुगे व कबुतर मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. (वृत्तसंस्था)

>कबुतराने आणलेला संदेश‘मोदीजी, १९७१मध्ये (भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी) होतो तसेच आजही आम्ही आहोत या भ्रमात राहू नका. आता भारताविरुद्ध लढायला आमचा बच्चाबच्चाही सज्ज आहे.’>फुग्यांवर चिकटविलेले संदेश१. ‘मोदीजी, अयुबी की तलवारें अभी भी हमारे पास है. इस्लाम झिंदाबाद’२. पाकिस्तानचा नकाशा व ‘आय लव्ह पाकिस्तान’>गुजरातच्या किनाऱ्यावर पकडली पाकिस्तानी बोट भारतीय तटरक्षक दलाने रविवारी गुजरातच्या किनाऱ्यावर पाकिस्तानी बोट पकडली. यात ९ जण होते. तटरक्षक दलाने सांगितले, गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यालगत सकाळी सव्वादहाला ही बोट पकडली. हे पाकचे मच्छिमार असल्याचे दिसून येत आहे. भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरात केलेल्या कारवाईनंतर सुरक्षा एजन्सी अधिक सतर्क आहेत. पोरबंदर येथे या ९ जणांची चौकशी होणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले.