शिवाजी नगरात पूर्ववैमनस्यातून हाणामारी
By admin | Updated: April 16, 2016 00:35 IST
जळगाव: शिवाजी नगरात शुक्रवारी दुपारी साडे चार वाजता पूर्ववैमनस्यातून दोन गटात हाणामारी झाली. एका गटाचे तीन तर दुसर्या गटाचे दोन असे पाच जण एकमेकावर चाल करुन आल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी काही तरुणांनी तलवारीही बाहेर काढल्या होत्या.त्यामुळे तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान,यातील एका जणावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांना समजल्यानंतर हाणामारी करणारे तेथून गायब झाले होते, मात्र दोन्हीपैकी कोणत्याच गटाने तक्र्रार न दिल्याने गुन्हा दाखल झाला नाही. हाणामारीचे कारणही समजू शकले नाही, मात्र दोन्ही गटात यापूर्वी वाद झाले होते, ठाणे अमलदाराला विचारणा केली असता असा वाद झाल्याचे माहित नसल्याचे त्यांनी सांगितले.