प्रवीण : मस्ट : फोटो आहे : वाढदिवस साजरा

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:01+5:302015-02-14T23:51:01+5:30

उद्योग मंत्र्यांचा वाढदिवस थाटात

Pravin: Must: Photo: Birthday Celebration | प्रवीण : मस्ट : फोटो आहे : वाढदिवस साजरा

प्रवीण : मस्ट : फोटो आहे : वाढदिवस साजरा

्योग मंत्र्यांचा वाढदिवस थाटात
फोंडा : शिरोडा मतदारसंघाचे आमदार आणि गोव्याचे उद्योग आणि सहकार मंत्री महादेव नाईक यांचा वाढदिवस शनिवारी उत्साहात व थाटात साजरा झाला. राजकारण, उद्योग, सामाजिक, सांस्कृतिक व सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मंत्री नाईक यांची शिरोडा येथे जाऊन भेट घेतली व त्यांना वाढदिनाच्या शुभेच्छा दिल्या. मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते तसेच नाईक यांचे हितचिंतक वाढदिन सोहळ्यात सहभागी झाले. लोकमतचे महाव्यवस्थापक संदिप गुप्ते व इतर वरिष्ठांनी मंत्री नाईक यांची भेट घेऊन त्यांना वाढदिनाच्या शुभेच्या दिल्या. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह अनेक मंत्री- आमदारांनी मंत्री नाईक यांची भेट घेतली. मंत्री नाईक हे भाजपच्या तिकीटावर शिरोडा विधानसभा मतदारसंघातून सलग दोनवेळा निवडून आले आहेत.
(प्रतिनिधी)

Web Title: Pravin: Must: Photo: Birthday Celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.