शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर आठ कोटी हिंदूंच्या घामाच्या पैशाने बांधले आहे, कोणी एकट्याने नाही - प्रवीण तोगडिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 18:11 IST

२२ जानेवारीला अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.

२२ जानेवारीला अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामललाचा अभिषेक सोहळा पार पडला. रामभक्तांच्या देणगीतून हे भव्य राम मंदिरात उभारण्यात आले आहे. राम मंदिराचा कारभार सांभाळण्यासाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. मंदिराबद्दल बोलताना आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी सांगितले की, अयोध्येतील भगवान प्रभू श्री रामाचे भव्य मंदिर हे कोणा एका व्यक्तीच्या पैशाने बांधले गेले नाही तर देशातील आठ कोटी हिंदूंच्या कष्टाच्या पैशातून उभारण्यात आले आहे. ते मथुरा येथे बोलत होते.

आठ कोटी हिंदू बांधवांनी मंदिराच्या बांधकामासाठी १९८९ मध्ये राबविण्यात आलेल्या मोहिमेत १.२५ रूपयांची देणगी दिली होती. तोगडिया बुधवारी वृंदावन येथील आश्रमात माध्यमांशी बोलत होते. तोगडिया म्हणाले की, उत्तर प्रदेशातील अयोध्येत बांधलेले राम मंदिर हे हिंदूंच्या विजयाचे स्मारक आहे. १९८९ साली आठ कोटी हिंदूंनी हे मंदिर बांधण्यासाठी प्रत्येकी १.२५ रुपयांची देणगी दिली होती, त्यामुळे हे मंदिर कोणा एका व्यक्तीच्या पैशाने नाही तर आठ कोटी हिंदूंच्या घामाच्या पैशाने बांधण्यात आले आहे. 

राम मंदिर ८ कोटी हिंदूंच्या घामाच्या पैशाने - तोगडिया तसेच १९८९ मध्ये पैसे मिळाल्यानंतर मंदिराचे बांधकाम सुरू करण्यासाठी आम्ही २४० बाय १२० फूट पायथ्याचे भव्य मंदिर तयार केले आणि दगडी कोरीव काम सुरू केले. मागील ३२ वर्षांत ६० हजार घनफूट दगड देणगीतून मिळालेल्या पैशातून बनवण्यात आला, असे त्यांनी सांगितले. तोगडिया यांनी दावा केला की, सध्या जे मंदिर बांधले जात आहे, त्याचा ५४ हजार घनफूट पाया त्याच पैशातून तयार करण्यात आला आहे, त्यामुळे हे मंदिर १.२५ च्या पैशांतून ५४ हजार घनफूट दगडाने बनवले गेले आहे असे म्हणता येईल. म्हणूनच राम मंदिर उभारणीसाठी आठ कोटी हिंदूंच्या घामाचा पैसा लागला आहे. 

ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा सुरू करण्याच्या वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयावरही तोगडिया यांनी भाष्य केले. काशी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापीमध्ये भगवान काशी विश्वनाथाची पूजा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. याबद्दल तोगडिया म्हणाले की, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद या आदेशाचे स्वागत करत आहे. १९९३ पूर्वी देखील तिथे पूजा व्हायची. न्यायालयाच्या या आदेशानंतर राम मंदिराप्रमाणेच काशी आणि मथुरेत पुन्हा भव्य मंदिरे बांधली जावीत आणि भारतात हिंदूंच्या श्रद्धेचा आदर केला जावा, अशी आमची इच्छा आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याmathura-pcमथुराpraveen togadiaप्रवीण तोगडिया