देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर किंचित कमी होताना पाहायला मिळत आहे. देशात नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना पाहायला मिळत असली, तरी मृत्यूंचे वाढलेले प्रमाण चिंतेत भर टाकणारे ठरत आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनामुळे अनेक मुलांवरून आई-वडिलांचे छत्र हरपलं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला असून, अनाथ मुलांसाठी पीएम केअर्स फंडातून १० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. यावरून निवडणूक रणनितिकार प्रशांत किशोर यांनी मोदी सरकावर निशाणा साधला आहे. सरकार केवळ आश्वासनं देतं. परंतु मदत देण्याच्या वेळी अयशस्वी ठरतं असल्याचं प्रशांत किशोर म्हणाले. "मोदी सरकराचा आणखी एक मास्टरस्ट्रोक. यावेळी कोविज आणि त्याच्या खराब व्यवस्थापनामुळे फटका बसलेल्या मुलांसाठी सहानुभूती आणि देखभालीची परिभाषा व्याख्या तयार केली जात आहे. अशा वेळी जेव्हा मुलांना अधिक मदतीची आवश्यकता असते, तेव्हा त्यांना वयाच्या १८ व्या वर्षी वेतनाचे आश्वासन दिलं, त्याबद्दल त्यांना सकारात्मक वाटलं पाहिजे का?," असा सवाल प्रशांत किशोर यांनी केला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधला. "पंतप्रधान कार्यालयाला आपण धन्यवाद केलं पाहिजे जे आम्हाला आयुष्यमान भारतच्या योजनांमध्ये नामांकित करतात. जेणेकरून ५० कोटी भारतीयांच्या आरोग्यासंबंधीच्या गरजांना पूर्ण केलं जाऊ शकेल. परंतु गरज भासल्यावर ऑक्सिजन आणि बेड देण्यातही ते अयशस्वी ठरतात," असंही त्यांनी नमूद केलं.
केवळ आश्वासनं, मदत नाही; अनाथ मुलांसाठी सरकारनं केलेल्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 20:07 IST
अनाथ मुलांसाठी पीएम केअर्स फंडातून १० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. यावरून प्रशांत किशोर यांनी साधला निशाणा.
केवळ आश्वासनं, मदत नाही; अनाथ मुलांसाठी सरकारनं केलेल्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांची टीका
ठळक मुद्देअनाथ मुलांसाठी पीएम केअर्स फंडातून १० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.यावरून प्रशांत किशोर यांनी साधला निशाणा.