शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत किशोर पुन्हा भाजपासाठी काम करणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 12:37 IST

पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये यश मिळवणं, प्रादेशिक पक्षांनी वर मान काढायला सुरुवात करणं ही भाजपासमोरील सध्याचं सर्वात मोठं आव्हान आहे.

ठळक मुद्देनिवडणूकतज्ज्ञ प्रशांत किशोर पुन्हा भाजपासाठी येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. प्रशांत किशोर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या सहा महिन्यांपासून संपर्कात आहेत.

नवी दिल्ली- पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये यश मिळवणं, प्रादेशिक पक्षांनी वर मान काढायला सुरुवात करणं ही भाजपासमोरील सध्याचं सर्वात मोठं आव्हान आहे. त्यातच गुजरातमध्ये काँग्रेसने दिलेली टक्कर आणि राजस्थानच्या पोटनिवडणुकांमध्ये झालेला पराभव यामुळे भाजपाच्या गोटात चिंतेचं वातावरण होत. पण आता भाजपाला दिलासा देणारी नवी शक्यता ऐकायला मिळत आहे, ती म्हणजे निवडणूकतज्ज्ञ प्रशांत किशोर पुन्हा भाजपासाठी येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. हिंदुस्तान टाइम्सनो याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या या वृत्तानुसार प्रशांत किशोर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या सहा महिन्यांपासून संपर्कात आहेत आणि प्रशांत किशोर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाही भेटले आहेत. त्यामुळे प्रशांत किशोर २०१९ साली होणार्या लोकसभा निवडणुकसाठी भाजपाबरोबर काम करतील अशी शक्यता निर्माण झाल्याचे खात्रीशीर सूत्रांच्या हवाल्याने हिंदुस्तान टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. यापुर्वी प्रशांत किशोर यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी २०१२ सालच्या गुजरात विधानसभेसाठी आणि नंतर २०१४ या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीसाठी काम केले होते. या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले होते. मात्र २०१४ च्या निवडणुकीनंतर त्यांचे भाजपाशी समबंध फार काळ सुरळीत राहिले नाहीत.

त्यानंतर २०१५ साली झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस, जदयू, राजद आघाडीसाठी काम करुन त्यांना यश मिळवून दिले. त्यामुळे एक आघाडीचे यशस्वी निवडणूक धोरणतज्ज्ञ म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली. बिहारनंतर त्यांनी काँग्रेससाठी उत्तर प्रदेश आणि पंजाबसाठी काम केले. 

पंजाबमध्ये काँग्रेसची सगळी सूत्रे कँ. अमरिंदर सिंग यांच्याकडे असल्याने त्या निवडणुकीत त्यांचा ठसा दिसला नाही आणि भाजपाच्या रेट्यापुढे उत्तर प्रदेशात काँग्रेसचे काहीच चालले नाही. उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मोठा पराभव झाला. जदयू आणि भाजपा पुन्हा एकत्र आल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा भाजपाच्या दिशेने वळल्याची चर्चा सुरु आहे. प्रशांत किशोर बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांच्याही जवळचे मानले जातात. त्याचाच परिणाम म्हणून हा नवा बदल दिसत असावा

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी