शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

Prashant Kishor: “काँग्रेस १० वर्षांत ९० टक्के निवडणुका हरली”; प्रशांत किशोरनी सांगितला BJP पराभवाचा फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 13:29 IST

तुम्ही पंतप्रधान मोदींचे भक्त आहात की, राहुल गांधींचे समर्थक या विचारसरणीमुळे विरोधकांना नुकसान होत आहे, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: आगामी पाच राज्यांमधील विधासभा निवडणुकांसह २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकांबाबतही आता राजकीय पक्षांनी चाचपणी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. अशातच भाजपविरोधात महाआघाडी करून खिंडीत गाठण्याचा प्रयत्न सर्व राजकीय पक्ष करताना दिसत आहेत. अशातच राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी भाजपला पराभूत करण्याचा फॉर्म्युला सांगितला असून, विरोधी पक्ष म्हणजे केवळ काँग्रेसच आहे का, अशी विचारणा केली आहे. 

तुम्ही पंतप्रधान मोदींचे भक्त आहात की, राहुल गांधी यांचे समर्थक या बायनरीमुळे विरोधकांना नुकसान होत आहे. परिस्थिती अधिक आव्हानात्मक आणि तितकीच गुंतागुंतीची आहे. एकूणच राजकीय आणि देशातील परिस्थितीचा बारकाइने विचार करण्याची गरज आहे आणि त्यानंतरच एखादी रणनीति आखली गेली पाहिजे, असे स्पष्ट मत प्रशांत किशोर यांनी मांडले आहे. 

एक पक्ष म्हणून काँग्रेसचा ग्राफ पडत आहे

काँग्रेस गेल्या १० वर्षात ५० हून अधिक निवडणुकीत पराभूत झाली आहे. कर्नाटक, पंजाब, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचा विजय झाला असला तरी ज्या पद्धतीने काँग्रेस नेते जनतेत जातात, त्यांच्यात मिसळतात, त्यांच्याशी संवाद साधतात, त्यात काही गडबड आहे. विरोधी पक्ष म्हणजे केवळ काँग्रेस नाही. इतरही पक्ष आहेत. १९८४ नंतर काँग्रेसने कोणतीही सार्वजनिक निवडणूक जिंकलेली नाही. त्यानंतर १५ वर्ष सत्ता उपभोगली असली तरी १९८९ मध्ये काँग्रेसला १९८ जागा मिलाल्या होता. तरी सरकार बनले नाही. २००४ मध्ये तर केवळ १४५ जागा मिळाल्या होत्या. आघाडीच्या माध्यमातून सरकार स्थापन करण्यात आले. एक पक्ष म्हणून काँग्रेसचा ग्राफ पडत आहे हे यातून दिसून येते, असे प्रशांत किशोर म्हणाले. 

भूतकाळात जे झाले, ते पाहून काही धडे घेतले पाहिजे

२०२२ मध्ये उत्तर प्रदेशात निवडणुका होत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात जो निकाल येईल तोच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही कायम असेल असे नाही. यूपीत जे होईल तेच लोकसभेला होईल, अशी अनेकांची धारणा असून ती चुकीची आहे. भाजपला पराभूत करायचे असेल तर भाजपच्या विरोधात सर्वच पक्षांनी एकत्र येण्याची गरज नाही. आसाम आणि उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये भाजपविरोधी महाआघाडी करण्यात आली होती. मात्र, त्याचे काय झाले हे तुम्हाला माहिती आहे. भूतकाळात जे झाले, ते पाहून काही धडे घेतले पाहिजे. केवळ सर्व पक्षांनी भाजपच्या विरोधात एकत्र येणे हा काही रामबाण उपाय नाही. त्यासाठी तुम्हाला एक चेहरा हवा. एक विचार हवा. आकडा असावा. प्रचारासाठी मशिनरी हवी. या गोष्टी असतील तर भाजपच्या विरोधात आव्हान उभे करू शकता, असे प्रशांत किशोर यांनी नमूद केले. प्रशांत किशोर यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत निवडणुकांविषयीचे विचार स्पष्टपणे मांडले.

दरम्यान, पंतप्रधान गेल्या ५० वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय जीवनात आहेत. त्यातील १५ वर्ष ते आरएसएसचे प्रचारक होते. त्यामुळे त्यांनी लोकांशी संवाद साधणे, त्यांना समजून घेणे या गोष्टी आत्मसात केल्या आहेत. त्यानंतर त्यांनी १० ते १५ वर्ष भाजपचे संघटक म्हणून काम पाहिले आहे.  कोणत्याही मुद्द्यावर अनेक लोकांकडून माहिती जाणून घेण्याचा त्यांचा गुण आहे. भाजपची राजकीय ताकद संपवणे कठीण आहे. भाजपला इथवर कोणी आणले आहे, हे पाहिले पाहिजे. एक संघटना म्हणून ५० ते ६० वर्ष त्यांनी काम केले आहे, असेही प्रशांत किशोर यांनी सांगितले.  

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाElectionनिवडणूकPoliticsराजकारण