प्रशांत भूषण यांना चपलेने मारेन - गायक अभिजीत

By Admin | Updated: July 30, 2015 21:19 IST2015-07-30T21:19:04+5:302015-07-30T21:19:04+5:30

याकूब मेमनच्या फाशीला स्थगिती मिळावी यासाठी प्रयत्न करणारे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण यांना फाटक्या चपलेने मारहाण केली पाहिजे असे वादग्रस्त विधान गायक अभिजीत यांनी केले आहे.

Prashant Bhushan slapped by Maren - singer Abhijit | प्रशांत भूषण यांना चपलेने मारेन - गायक अभिजीत

प्रशांत भूषण यांना चपलेने मारेन - गायक अभिजीत

>ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. ३० - याकूब मेमनच्या फाशीला स्थगिती मिळावी यासाठी प्रयत्न करणारे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण यांना फाटक्या चपलेने मारहाण केली पाहिजे असे वादग्रस्त विधान गायक अभिजीत यांनी केले आहे. 
याकूब मेमनच्या फाशीला स्थगिती मिळावी यासाठी प्रशांत भूषण व अन्य तिघा वकिलांनी बुधवारी मध्यरात्री सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. प्रशांत भूषण यांच्या या कृतीवर अभिजीत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून भूषण यांच्यावर टीका करताना अभिजीत यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. भूषण यांच्याविषयी काय म्हणाल असा सवाल अभिजीत यांना एका चाहत्याने ट्विटरवर विचारला होता. यावर अभिजीत म्हणाले, भूषण यांना फाटक्या चपलेने मारेन. पण भूषण यांना मारण्यासाठी आता त्यांची वेळ घ्यावी लागेल, कारण देशातील अनेकजण भूषण यांना मारण्यासाठी रांगेत उभे आहेत. प्रसारमाध्यमांनी त्यांचे कॅमेरे तयार ठेवावेत असेही त्यांनी एका पत्रकाराला टॅग करत म्हटले आहे.

Web Title: Prashant Bhushan slapped by Maren - singer Abhijit