शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

प्रणव मुखर्जी यांच्या भारतरत्नवर ‘आप’ची आगपाखड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 06:10 IST

संजय सिंह यांची मोदी सरकार व रा.स्व. संघावर टीका

नवी दिल्ली : केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना भारतरत्न जाहीर केल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी या घोषणेचे स्वागत केले. मात्र आम आदमी पार्टी (आप) नेता, खासदार संजय सिंह यांनी नरेंद्र मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)वर टीका केली. मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रशंसा केल्याने त्यांना भारतरत्न देण्यात आले, असे सिंह यांनी म्हटले आहे.सिंह यांनी ‘ट्विट’केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, नेताजी सुभाषचन्द्र बोस, शहीदे आजम भगत सिंह, डॉ. राम मनोहर लोहिया,स्व. ध्यानचंद यांना आजपर्यंत भारतरत्न मिळाले नाही. नानाजी देशमुख, भूपेन हजारिका आणि ‘आप’च्या २० आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याचा मुद्दा पुढे नेणारे संघ प्रशंसक प्रणव मुखर्जी यांना मात्र भारतरत्न देण्यात आले. संजय सिंह यांनी म्हटले आहे की, भाजपाची भारतरत्न योजना म्हणजे एकदा संघ शाखेत जा, आणि भारतरत्न बना, अशा छापाची आहे. भारतरत्न किताबाची त्यामुळे टिंगल झाली आहे.दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी एकाच वेळी तीन भारतरत्न देण्याचा निर्णय राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा मानला जात आहे. विशेष म्हणजे प्रणब मुखर्जी यांची निवड चकित करणारी आहे. ते राष्ट्रपती असताना त्यांचा सरकारशी चांगला समन्वय होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य प्रमुख लोकांशीही व्यक्तिगत संबंध चांगले होते. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपाने प्रणब मुखर्जी यांच्या विरोधात मतदान केले होते. मात्र मुखर्जी यांनी पदाच्या प्रतिष्ठेची जाणीव जाहीरपणे करून दिली.मुखर्जी यांनी मानले आभारमुखर्जी यांनी भारतरत्नपदी निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. या सन्मानासाठी मी समस्त देशवासीयांबद्दल विनम्रता आणि कृतज्ञता व्यक्त करतो,असे त्यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी प्रणब मुखर्जी यांचे फोनवरुन संपर्क साधत अभिनंदन केले आहे. तसेच ‘ट्विट’ही केले आहे. प्रणवदा आमच्या काळातील उत्तम राजनेते आहेत. अनेक दशके त्यांनी देशाची निस्वार्थ सेवा केली. अथक परिश्रम केले. त्यामुळे देशाच्या विकासाची खास छाप पडली आहे.

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीAAPआपcongressकाँग्रेसBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ