प्रज्ञा - पन्नास हजार भाविकांनी घेतले भुलेश्वरी दर्शन
By Admin | Updated: August 17, 2015 22:38 IST2015-08-17T22:38:40+5:302015-08-17T22:38:40+5:30
भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील श्रीक्षेत्र भुलेश्वर येथे आज श्रावणातील पहिल्या सोमवारी रांगेत उभे राहून जवळपास ५० हजारांवर भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले.

प्रज्ञा - पन्नास हजार भाविकांनी घेतले भुलेश्वरी दर्शन
भ लेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील श्रीक्षेत्र भुलेश्वर येथे आज श्रावणातील पहिल्या सोमवारी रांगेत उभे राहून जवळपास ५० हजारांवर भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले.रात्री बारानंतर अनेक भाविकांनी भुलेश्वरी शिवलिंगाचे दर्शन घेतले. पहाटे पाच वाजता शिवलिंगाला दही, दूध व पंचामृताने अंघोळ घालण्यात आली. पिंड व लिंग विविधरंगी फुलांनी सजवण्यात आले. पूजा करून महाआरती करण्यात आली. सकाळी सहा वाजता पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील यांनी माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने पूजा केली. या वेळी श्री भुलेश्वर देवस्थानाचे अध्यक्ष अरुण यादव, माळशिरसच्या सरपंच सुरेखा यादव, उपसरपंच काकासाहेब यादव, संतोष यादव, सर्कल अधिकारी घाडगे, पोलीस पाटील नरेंद्र यादव, सुनील यादव, गावकामगार तलाठी मनीषा भोंगळे व ग्रामस्थ उपस्थित होते.सकाळी १० वाजता भुलेश्वराची पालखी माळशिरस येथील काळे वाड्यात सजवण्यात आली. पूजा केल्यानंतर पालखी माळशिरस गावातून मिरवण्यात आली. पालखी वाजतगाजत भुलेश्वर चौकात आली. या ठिकाणी आरती होऊन पालखी भुलेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाली. दुपारी बारा वाजता पालखी पाण्याच्या कुंडापाशी आली. माळशिरस व परिसरातील मानाच्या कावडींमध्ये पाणी भरण्यात आले. भुलेश्वराच्या मूर्तीला पाण्याच्या कुंडामध्ये स्नान घालण्यात आले. महाआरती होऊन कावड व पालखी मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत कावड मिरवणूक व पालखी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी अडीच वाजता भुलेश्वर मंदिराच्या प्रवेद्वाराजवळ कावडींची पाण्याची धार घालण्यात आली. त्यानंतर भुलेश्वर पालखी मंदिरासमोर ठेवण्यात आली. जेजुरी पोलीस ठाण्याच्या वतीने रांगेत उभे राहण्याची जाळी देण्यात आल्याने दर्शन रांगेतच घ्यावे लागले. जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी केलेल्या अवाहनामुळे हुल्लडबाजी होऊ शकली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पिण्याच्या पाण्याचा टँकर देण्यात आला होता. माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य सेवा देण्यात आली. बालाजी देवस्थानच्या वतीने स्वयंसेवक देण्यात आले होते. माळशिरस गावाच्या वतीने १० ग्रामसुरक्षा दल हजर होते. भिवडी गावचे राहुल गायकवाड, माळशिरसचे संतोष यादव, बाळासाहेब बंडगर, लक्ष्मण बंडगर, म्हफाजी बंडगर, हाबाजी बंडगर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. ०००