प्रज्ञा - चाकणला १००१ झाडांचे वृक्षारोपण

By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:05+5:302015-08-18T21:37:05+5:30

चाकण : दिवसेंदिवस वृक्षतोड वाढत चालल्याने पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. त्यामुळे वृक्षलागवड करणे ही काळाची गरज असून, वृक्षलागवडीसाठी महिलांनी घेतलेला पुढाकार समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे मत दिशा एक्स्पोर्टच्या संचालिका शालिनी झा यांनी व्यक्त केले.

Pragya - Chakan 1001 tree plantation | प्रज्ञा - चाकणला १००१ झाडांचे वृक्षारोपण

प्रज्ञा - चाकणला १००१ झाडांचे वृक्षारोपण

कण : दिवसेंदिवस वृक्षतोड वाढत चालल्याने पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. त्यामुळे वृक्षलागवड करणे ही काळाची गरज असून, वृक्षलागवडीसाठी महिलांनी घेतलेला पुढाकार समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे मत दिशा एक्स्पोर्टच्या संचालिका शालिनी झा यांनी व्यक्त केले.
स‘ाद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतीक जाधव यांच्या नेतृत्वाखाली चाकण व परिसरात तब्बल १००१ झाडांचे वृक्षारोपण श्रीमती झा यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी दिशा एक्स्पोर्टचे संचालक अजयकुमार झा, उद्योजक हर्षद शिंदे, सूरज नाणेकर, कुणाल कड, किरण राजापूरकर, प्रशांत टोपे, अक्षय लोणारे, विशाल बारवकर, रोहित गोंडवळ, किरण गाडे, सागर धाडगे, योगेश धाडगे, प्रशांत गाडेकर, स्वप्नील बारणे, तेजस मुंगसे, रवींद्र भोगाडे, संतोष घावटे, विमल जांगडे, अनिता देवकाते, रूपाली राऊत, शीतल एरंडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी रूपाली राऊत, अनिता देवकाते, अजयकुमार झा आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रतीक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चाकणसह काळूस, शेलगाव, वडगाव पाटोळे, वाकी, भोसे, चाकण, शिरूर, कामशेत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्येही रोपांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्यकर्ते गोकुळ गोरे यांनी योगा, ध्यान व प्राणायाम यांवर मार्गदर्शन केले. विमल जांगडे, शीतल एरंडे यांनी स्वागत केले. देविदास देवकाते यांनी सूत्रसंचालन केले. अजय झा यांनी आभार मानले.

फोटो : चाकण येथील सानवी हाइटस्मध्ये महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
०००००

Web Title: Pragya - Chakan 1001 tree plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.