प्रज्ञा -गाडकवाडीच्या सरपंचपदी रणपिसे
By Admin | Updated: May 26, 2015 02:03 IST2015-05-26T02:03:19+5:302015-05-26T02:03:19+5:30
गाडकवाडीच्या सरपंचपदी रणपिसे

प्रज्ञा -गाडकवाडीच्या सरपंचपदी रणपिसे
ग डकवाडीच्या सरपंचपदी रणपिसेवाफगाव : गाडकवाडी (ता. खेड) येथील सरपंच दीपाली रणपिसे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने त्यांचे पद रिक्त झाले होते. त्या जागी मीनाताई रणपिसे यांची निवड करण्यात आली. उपसरपंच म्हणून वैभव गावडे यांना कायम ठेवण्यात आले. उपसरपंच वैभव गावडे यांच्या सहकार्याने व संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने मी आज सरपंचपदावर विराजमान झाले आहे. त्यामुळे मी गावाचा विकास करण्यासाठी नेहमी तत्पर राहीन, असे मत नवनिर्वाचित सरपंच मीनाताई रणपिसे यांनी मांडले. या वेळी ग्रा. सदस्य कुंदा गावडे, दत्तात्रय जगताप, विजया चौधरी, मीनाताई गावडे व ग्रामस्थ उपस्थित होते.फोटो ओळ:१. नवनिर्वाचित सरपंच मीनाताई रणपिसे२. उपसरपंच वैभव गावडे.